भुसावळरेल्वे

भुसावळमार्गे मुंबईकडे धावणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेसचा दर्जा अन् क्रमांक बदलला

जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते रक्सौलदरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या दर्जात आणि गाडी क्रमांकात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत सुपरफास्ट श्रेणीत धावणारी ही एक्स्प्रेस आता नॉन सुपरफास्ट श्रेणीत चालवण्यात येणार आहे. या बदलाची अंमलबजावणी जानेवारी २०२७ पासून होणार असून, दोन्ही दिशांच्या गाड्यांचे क्रमांकही बदलण्यात आले आहेत.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एलटीटी-रक्सौल एक्स्प्रेसचा सध्याचा १२५४६ हा गाडी क्रमांक बदलून आता १५५४६ करण्यात आला आहे. सुधारित क्रमांकाची ही गाडी २ जानेवारी २०२७ पासून धावणार आहे. तर रक्सौल-एलटीटी एक्स्प्रेसचा सध्याचा १२५४५ हा क्रमांक बदलून १५५४५ करण्यात आला आहे. ही गाडी ७ जानेवारी २०२७ पासून नवीन क्रमांकाने धावेल.

विशेष म्हणजे, केवळ गाडीच्या क्रमांकातच नव्हे, तर तिच्या श्रेणीतही बदल करण्यात आला आहे. यापुढे ही गाडी सुपरफास्टऐवजी नॉन सुपरफास्ट म्हणून ओळखली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट आरक्षण करताना तसेच रेल्वेचे वेळापत्रक आणि प्रवासाची माहिती तपासताना नवीन गाडी क्रमांक लक्षात घेणे आवश्यक आहे.

जानेवारी २०२७ पासून होणाऱ्या या बदलामुळे प्रवाशांनी जुन्या क्रमांकाऐवजी नवीन क्रमांकाचा वापर करावा. प्रवासादरम्यान कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा रेल्वेच्या माहिती प्रणालीवर उपलब्ध असलेली अद्ययावत माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button