---Advertisement---
चाळीसगाव

Chalisagaon : चाळीसगावमधील मिरची बाजाराला भीषण आग ; शेजारीच पेट्रोल पंप असल्यानं खळबळ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२५ । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधून एक मोठी बातमी समोर आलीय. ज्यात चाळीसगाव शहरामधील मिरची बाजाराला भीषण आग लागल्याची घटना आज ११ एप्रिल रोजी दुपारी लागली.

mirchi bajar fire

या आगीमुळं परिसरात मोठ्या प्रमाणावर धोक्याचे लोट पसरले असून घटनेच्या शेजारी पेट्रोल पंप असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये अधिक घबराट निर्माण झाली आहे. आगीमुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या आगीत १२ दुकानांसह एक मालट्रक व दुचाकी जळून खाक झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

---Advertisement---

याबाबत असे की, चाळीसगाव शहरातील नागद रोडवर मिरची बाजार आहे. या मिरची बाजाराला आज दुपारी भीषण आग लागली. मिरची बाजारात मोठ्या प्रमाणात मिरची आणि इतर शेतमालाचा साठा होता. जो या आगीत जळून खाक झाला असण्याची शक्यता आहे. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच या आगीत एक ट्रक देखील जळून खाक झाला असल्याची माहिती समोर आलीय. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान आग लागलेल्या घटनाशेजारीच पेट्रोल पंप असल्याने परिसरात एकच धावपळ उडाली आहे. अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत सुरु आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झालेली नाही. मात्र, आगीमुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पोलिस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत करत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment