⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

केंद्र सरकारचा पुन्हा डिजिटल सर्जिकल स्ट्राईक ; ‘या’ 14 अ‍ॅप्सवर घातली बंदी..

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२३ । दहशतवाद्यांना आळा घालण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील माहिती प्रसारित करण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवादी वापरत असलेले 14 मेसेंजर मोबाइल अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत. या अ‍ॅप्सच्या मदतीने पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्ये काहीतरी मोठे नियोजन करत होते. मात्र भारत सरकारने हे अ‍ॅप ब्लॉक करून मोठी योजना फसली आहे.

या अ‍ॅप्सवर बंदी घातली
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की सरकारने ब्लॉक केलेल्या अ‍ॅप्समध्ये Crypvisor, Enigma, SafeSwiss, Vikrame, Mediafire, Briar, Beechat, Nandbox, Conion, IMO, Element, Second Line, Jangi, Threema इत्यादींचा समावेश आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, हे अ‍ॅप्स काश्मीरमधील दहशतवादी त्यांचे समर्थक आणि ऑन-ग्राउंड वर्कर्स (OGW) यांच्याशी संवाद साधण्यासाठी वापरत होते.

राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या मोबाईल ऍप्लिकेशन्सवर सरकारी कारवाई ही अलीकडची घटना नाही. यापूर्वी, भारत सरकारने अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. गेल्या काही वर्षांत सुमारे 250 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

जून 2020 पर्यंत, TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser, Xender, CamScanner यांसारख्या लोकप्रिय अ‍ॅप्ससह 200 हून अधिक चिनी अ‍ॅप्स तसेच PUBG मोबाइल आणि लोकप्रिय मोबाइल गेम गरेना यांचा समावेश आहे. फ्री फायरवर बंदी घालण्यात आली आहे.