⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

दिशाभूल करणाऱ्या आव्हानांना बळी न पडता अभ्यासपूर्ण गुंतवणूक करावी : डॉ.रवी अहूजा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१। ज्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे त्या क्षेत्रासंबंधी अधिकाधिक वाचन करावे व दिशाभूल करणाऱ्या आव्हानांना बळी न पडता अभ्यासपूर्णरीत्या गुंतवणूक करावी, असा सल्ला सेबीचे डॉ.रवी अहुजा यांनी दिला.

एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणूक जागरूकता कार्यक्रमाअंतर्गत ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणुकीसंबंधी जागृतता निर्माण व्हावी, या हेतून या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे बोलतांना डॉ.रवी अहुजा यांनी, गुंतवणूकदारांना शेअर मार्केट, म्युचअल फंड, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, डिमॅट अकाउंट कसे उघडावे, गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी बघाव्यात याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या शंकांचे निरसन केले. यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य एन.ए. पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.ए. बडगुजर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. एरंडोल तालुक्यातील नागरिक व गुंतवणूकदारांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्तविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. संदिप कोतकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. अतुल पाटील यांनी केले. यशस्वितेसाठी प्रा.जितेंद्र महाजन, प्रा.योगेश पाटील, प्रा.मोमीन शेख आदींनी परिश्रम घेतले.