---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे पाचोरा

दुचाकीने घरी परताना दोन मित्रांसोबत घडलं विपरीत ; एक ठार, दुसऱ्याचे दोन्ही पाय फॅक्चर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना वाढतच असल्याचं दिसत असून अशातच कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार तरुणाचा जागेवर मृत्यू झाला. भुषण संतोष हटकर (वय – २०) असं मृत तरुणाचं नाव आहे. दरम्यान या अपघातात भूषण याच्या मागे बसलेल्या दुसऱ्या तरुणाचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. ही घटना पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपुलावर घडली असून याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident jpg webp

नेमकी काय आहे घटना?
जळगाव चौफुली जवळील श्रीकृष्ण नगर परीसरातील रहिवासी असलेले भुषण संतोष हटकर आणि त्याचा मित्र प्रविण नाना हटकर (वय – २२) हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ ई डी २१९६) वरुन रात्री घरी जात होते. दरम्यान जारगाव चौफुलीकडून (एमएच १५ – बीएन १०३५) मधील दोघेजण भडगाव रोडकडे जात असतांना दोन्ही वाहने एकमेकांवर आदळले. यात दुचाकीस्वार भुषण हटकर हा जागेवर ठार झाला तर त्याचे मागे बसलेला प्रविण नाना हटकर याचे दोन्ही पाय फॅक्चर झाले.

---Advertisement---

व चारचाकी वाहनातील देशमुखवाडी परीसरातील दोघ इसम गंभीर जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. या अपघात प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---