⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | महाराष्ट्र | अखेर महाराष्ट्रात मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख निश्चित, कुणाला मिळणार संधी?वाचा ‘ही’ संभाव्य मंत्र्यांची यादी

अखेर महाराष्ट्रात मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख निश्चित, कुणाला मिळणार संधी?वाचा ‘ही’ संभाव्य मंत्र्यांची यादी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्र्रात शिंदे-भाजपचे (Shinde – BJP) सरकार स्थापनला महिना उलटून गेला. तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीय. यावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात. अशातच मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 5 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार संध्याकाळी राजभवनात होणार आहे. दरम्यान, 12 संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आलीय. त्यात भाजपकडून 7 आणि शिंदे गटातील 5 नावांचा समावेश आहे. Cabinet expansion in Maharashtra

मंगळवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लवकरच आम्ही आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. पूर्ण मंत्रिमंडळ नसले तरी सरकार सक्षमपणे काम करत आहे. आम्ही असे अनेक निर्णय घेतले आहेत जे लोकाभिमुख आहेत, असेही ते म्हणाले होते. त्याचवेळी महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार एका महिन्यात झाला नसला तरी शिंदे सरकारने महिनाभरात 751 सरकारी आदेश जारी केले आहेत. यापैकी १०० हून अधिक आदेश एकट्या आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. यापूर्वी शिवसेनेच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने चार दिवसांत १८२ सरकारी आदेश जारी केले होते.

खरे तर सरकार स्थापन होऊनही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यास शिंदे यांचे सरकारही विरोधकांच्या निशाण्यावर आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अनेकवेळा शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटाने मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला तयार केला आहे. दरम्यान, सध्या 12 संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आली असून त्यात भाजपकडून 7 आणि शिंदे गटातील 5 नावांचा समावेश आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा समावेश आहे. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसेंचाही समावेश करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

शिंदे गटातील कुणाची लॉटरी लागणार?
गुलाबराव पाटील
उदय सामंत
अब्दुल सत्तार
दादा भुसे
शंभुराज देसाई

भाजपकडून कुणाला संधी मिळणार?
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
चंद्रशेखर बावनकुळे
राधाकृष्ण विखे पाटील
आशिष शेलार
प्रवीण दरेकर

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.