---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा पाचोरा

कुटुंब गाढ झोपेत; घरातून चोरट्यांनी लांबवीले लाखोंचे दागिने

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । 21 जानेवारी 2024 । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना घडत आहे. अशातच पाचोऱ्यात चोरट्यांनी खिडकीचे गज तोडून कपाटातील तब्बल सात लाख 21 हजारांचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

chori 2

याबात असे की पाचोरा शहरातील स्टेट बँक कॉलनी भागात राहणारे दिनेश एकनाथ तावडे (40) हे शुक्रवारी रात्री टीव्हीवरील कार्यक्रम बघून 12 वाजता झोपल्यानंतर चोरट्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या बेडरूमच्या खिडकीचे गज कापले व घरात प्रवेश करीत कपाटातील सात लाख 21 हजार रुपये किंमतीचे व 23 तोळे व आठ ग्रॅम वजनाचे दागिणे व सात हजारांची रोकड लांबवली.

---Advertisement---

हा प्रकार शुक्रवार, 19 रोजी रात्री घडली तर शनिवरी शनिवारी सकाळी सात वाजता तावडे यांच्या पत्नीला बेडरूमचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलिस उपअधीक्षक धनंजय येरूळे, प्रभारी निरीक्षक किरण शिंदे व सहकार्‍यांनी भेट देत पाहणी केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---