Budget 2023 : गरिबांना सरकारची भेट, मोफत धान्यासाठी 2 लाख कोटींचे बजेट, संपूर्ण खर्च केंद्र उचलणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२३ । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2023-24 (Budget 2023) सादर केला. मोदी सरकारचा हा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यादरम्यान, अनेक मोठं-मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. त्यात देशातील गरिबांना मोफत अन्नधान्य देण्यासाठी मोदी सरकार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेवर 2 लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन केली. ते म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात 80 कोटी गरीब लोकांना अन्नधान्य पुरवून आम्ही कोणीही उपाशी झोपणार नाही याची काळजी घेतली.

सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना एका वर्षासाठी मोफत अन्नधान्य देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सुमारे 2 लाख कोटी रुपयांचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलत असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

केंद्र सरकारच्या एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) असे नाव देण्यात आले आहे, ज्या अंतर्गत 1 जानेवारीपासून 80 कोटींहून अधिक गरीब लोकांना मोफत अन्नधान्य दिले जात आहे. पीएमजीकेवाय या नावाने ओळखल्या जाणार्‍या दुसर्‍या योजनेअंतर्गत सरकारने गरीब लोकांना मासिक पाच किलो धान्याचे मोफत वितरण बंद केल्याबद्दल विरोधकांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल पुढे आले आहे.

कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर एप्रिल 2020 मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संपली. गेल्या महिन्यात, सरकारने PMGKAY ला दोन विद्यमान अन्न अनुदान योजनांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आणि परिणामी, नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना लागू झाली.