राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत जळगावच्या स्वरदा सानेला कास्यपदक

ऑगस्ट 22, 2022 4:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । नागपूर येथे नुकताच झालेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय मानांक टेबल टेनिस स्पर्धेत जळगावच्या स्वरदा साने हिने चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले. 13 वर्षाखालील मुलींच्या कॅडेट गटात तिने कास्यपदक पटकावले. तत्पूर्वी तिने पहिल्या व दुसऱ्या राउंड मध्ये मुंबई व पुण्याच्या स्पर्धकांचा सहज पराभव केला. ठाण्याच्या दुसऱ्या मानांकित स्वरा जांगडे हिच्या चुरशीच्या लढतीत 3/2 असा पराभव केला.

jalgaon 84

स्वरदा साने ही जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा, वाघनगर येथील विद्यार्थिनी असून जळगाव जिल्हा क्रीडा संघ येथे नेहमी सराव करते. तिला शैलेश जाधव, विक्रम केसकर, फिटनेस कोच अंकिता शेंडे यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. तसेच ती ऍडव्हान्स कोचिंग साठी नाशिकच्या जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयिका वैशाली पाटील यांनी स्वरदा साने हिचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now