⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयित महिलांना पकडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । पिशवीला ब्लेडने कापून २१ हजार रुपये लांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशियित महिलांना नागरिकांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी दोन्ही महिलांना पारोळा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

अधिक माहिती अशी की, १६ रोजी सेंट्रल बँकेसमोरील फळविक्रेत्याच्या स्टॉलसमोर फिर्यादी धर्मराज लोटन पाटील (वय ६८,रा.पारोळा) हे उभे होते. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत २१ हजारांची रोकड होती. पिशवीला ब्लेडने कापून थैलीतील रोकड लांबवण्याचा प्रयत्न अंजली सिसोदिया (वय २०), रचना सिसोदिया (वय ३०, रा.कठीया, जि.राजगड, मध्य प्रदेश) या दोन महिलांनी केला. वेळीच ही घटना नागरिकांच्या लक्षात आली. त्यामुळे नागरिकांनी दोन्ही महिलांना पकडले. कलम ३७९, ५११, ३४ प्रमाणे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दोन्ही संशयित महिलांना पारोळा न्यायालयात हजर केले.