Sunday, December 4, 2022

..जेव्हा ‘ती’ सोडून गेली, तेव्हा ‘के.के.’ने साथ दिली!

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । आयुष्याच्या वाटेवर प्रेमाच्या नावेत स्वार होऊन स्वप्नांच्या दुनियेत हरवत असताना जग कसे अप्रितम भासते. अडथळ्यांच्या लाटांमधून होणार सुखकर वाटत असताना प्रेमभंगाची त्सुनामी येते आणि आपला जोडीदार सोडून जातो तेव्हा हे जग नकोसे वाटते. कुठंतरी एकांतात निराश होऊन अश्रूंचा बांध वाहत असताना जवळचेही नको वाटतात अशा काळात अनेक प्रेमींना एका व्यक्तीने साथ दिली तो म्हणजे सुप्रसिद्ध गायक के.के. म्हणजेच कृष्णकुमार कुन्नथ. आजचा एक काळ असा आहे कि के.के.ची गाणी ऐकली नसतील असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. के.के.ची गाणी कोणती हे अनेकांना माहिती नसले तरी त्याची गाणी अनेकांच्या ओठांवर आहेत. प्रेमभंग झाल्यावर आठवणाऱ्या आठवणीत हरवून जाणाऱ्या गाण्यांची मोठी प्ले लिस्टच के.के.ची आहे.

  • लबो को लबो से सजादो, क्या हो तुम मुझे अब बतादो..
  • तू ही मेरी शब हैं, सुबह हैं, तू ही दिन हैं मेरा..
  • तडफ तडफ के इस दिल से आह निकालती रही, मुझको सजा दी प्यार ने..
  • सब झुटे झुटे वादे थे उनके, वो पिया आये ना..
  • सच कह रहा हैं दिवाना, दिल ना किसीसे लगाना..
  • हम रहे या ना रहे कल, पल याद आयेंगे वो पल..
- Advertisement -

के.के.ने गायलेल्या गाण्यांपैकी हि सुप्रसिद्ध गाणी नक्कीच कधीतरी प्रत्येकाचा ओठांवर असतील यात दुमत नाही. के.के.च्या गायक म्हणून आयुष्याची सुरुवात ‘पल’ या म्युझिक अल्बममधून झाली. के.के.चे पूर्ण नाव कृष्णकुमार कुन्नथ असे आहे. आपण सर्व त्यांना के.के.याच नावाने ओळखत होतो. के.के. यांचा जन्म २३ ऑगस्ट १९७० रोजी झाला. दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमधून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल कॉलेजमधून पदवी घेतली. के.के.ने हिंदी व्यतिरिक्त मराठी, बंगाली, गुजराती, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि तमिळ गाण्यांना आवाज दिला आहे. चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी के.के.ने जवळपास २५ हजार जिंगल्स गायल्या आहेत.

‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘तडप-तड्प के इस दिल से आह निकालती रही’ या गाण्यामुळे के.के.प्रकाशझोतात आले. गाणे सुपरहिट झाल्यावर के.के.ची गणना सुप्रसिद्ध गायकांच्या यादीत होऊ लागली. पदवीनंतर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून के.के.यांच्या कामाची सुरुवात झाली होती. मात्र, संगीताची आवड असल्याने त्यांनी ती नोकरी सोडली आणि मनोरंजन विश्वात नाव कमवण्यासाठी ते बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी आले. सुरुवातीला त्यांना फिरफिर देखील सहन करावी लागली मात्र हम दिल दे चुके सनम नंतर त्यांनी मागे पहिलेच नाही. एका माहितीनुसार के.के.यांनी आजवर २०० पेक्षा अधिक हिंदी गाणी गायली आहेत.

- Advertisement -

के.के. यांचे दि.३१ मे रोजी निधन झाले. गायक के.के. यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. के.के कोलकाता येथे एका कॉन्सर्टसाठी गेले होते. पण कॉन्सर्ट संपल्यानंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते कोसळले. त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. के.के.आज आपल्याला सोडून गेले असले तरी त्यांची गाणी कायम त्यांना अजरामर ठेवणार आहेत. आनंद, दुःख, मित्र, मैत्रिणींशी वेळ घालवतांना नक्की वाजवावी अशी गाणी त्यांनी आपल्याला दिलेली आहेत.

- Advertisement -
[adinserter block="2"]