जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२३ । राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकरी शेतीकामात गुंतला असून पाऊस पडण्याआधीच शेतकरी बी-बियाणे खरेदी करून ठेवतात. मात्र अनेक ठिकाणी बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या अनेक प्रकार समोर आले आहे. अशातच राज्यात नांदेड जिल्ह्यात सोयाबीनचे बोगस बियाणे जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जवळपास साठ लाख रुपये किमतीचा हा मुद्देमाल आहे. तसेच चाळीस लाख रुपये किंमतीचे ट्रकसह बियाणे जप्त करण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील नायगांव तालुक्यातील कोलंबी इथे ही कारवाई आहे. येथे सोयाबीनचे बनावट बियाणे तयार करून ते विक्रीसाठी नेले जात होते. गोदावरी सिडस अँड बायोटेक या नावाने हे बनावट बियाणे आढळून आले आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करत जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या बनावट बियाण्याच्या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.