जय समाधा गणेश मित्र मंडळाचे रक्तदान शिबीर उत्साहात, ३० जणांनी केले रक्तदान

सप्टेंबर 4, 2022 3:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२२ । राष्ट्रसेवा आणि समाजसेवेची भावना मनात ठेवून शहरातील जय समाधा गणेश मित्र मंडळांनी आज रविवारी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला कार्यकर्त्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी सुमारे ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

jalgaon 2022 09 04T144827.389

शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील पूज्य संत राजाराम नगर येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरीही रक्ताला पर्याय नाही. रक्ताचा प्रश्न सतत भेडसावत असतो. रुग्णांना रक्ताची गरज असली की कुटुंबीय सैरभैर होतात. थॅलेसेमिया असलेली मुले रक्ताचा तुटवडा पडला की जीवन-मरणाच्या रेषेवर झुंजत राहतात. रक्तदान करण्यासाठी गरज पडल्यास अनेकजण धावून येतात, तरीही रक्ताचा तुटवडा पडत असतो.

त्यामुळे जय समाधा गणेश मित्र मंडळाने राष्ट्रसेवा आणि समाजसेवेची भावना मनात ठेवून या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे जय समाधा गणेश मित्र मंडळातर्फे या प्रसंगी सांगण्यात आले. यावेळी परिसरातील कार्यकर्ता व जागरूक नागरिकांनी रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिरासाठी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र , जळगांव यांचे सहकार्य लाभले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now