विद्यापीठात रक्तदान शिबीर

एप्रिल 13, 2022 3:30 PM

जळगाव लाईव्ह न्युज । १३ एप्रिल २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे महात्मा फुले- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरात जवळपास ७५ विद्यार्थी, कर्मचारी व प्रधायपकांनी रक्तदान केले.

univercity jpg webp

विशेष म्हणजे विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. किशोर पवार यांनीही रक्तदान करन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, प्र. कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, प्रा. डॉ. म. सु. पगारे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ प्रकाशचंद जैन, अनिता वाघ, सुनील पावरा आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुण सपकाळे,राजू सोनवणे,जयंत सोनवणे, दुर्योधन साळुंखे, भैय्या पाटील आदींनी परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now