⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

राका हायस्कुलमधील शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू ; घातपाताची शक्यता

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२०२१ । भुसावळ तालुक्यातील शिंदी येथे राका हायस्कुलमधील शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आला आहे. रुबाब ईब्राहीम तडवी (वय-५२, रा. महेलखेडी, ता.यावल, ह. मु. फालक नगर भुसावळ) असे मृत शिक्षकाचे नाव असून या प्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

रुबाब तडवी यांचा शिंदी गावाजवळ बुधवारी १० मार्च रोजी रात्री ८ वाजता संशयास्पद आढळून आले होते. त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. सदरची माहीती मिळताच शिंदी गावातील पोलीस पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेले रूबाब तडवी यांना रूग्णवाहीकेव्दारे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी रवाना केले. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मयत तडवी यांनी मंगळवारी हायस्कुलमधुन सुटी घेतली होती. रूबाब तडवी मुळ महेलखेडी ता. यावल येथील रहिवाशी असुन मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुल असे कुटुंब असुन, काल महेलखेळी गावात त्यांचा शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. या घटनेबाबतची नोंद भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

बालसुधारगृहातून पलायन केलेल्या अट्टल चोरट्यास अटक

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२०२१ । पोट दुखण्याचा बहाणा करुन मध्य प्रदेशातील बालसुधारगृहातून पलायन केलेल्या अल्पवयीन अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी चोपड्यातून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरी केलेल्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आलेल्या आहेत. 

संशयित अल्पवयीन चोरट्याला मध्य प्रदेश पोलिसांनी घरफोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पकडले होते. तेथील मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर त्याला तेथी बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. तेथे पोट दुखत असल्याचा बहाणा करुन त्याने तेथून पलायन केले होते. याबाबत मध्य प्रदेशातील कोतवाली झाबुवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. त्याने पलायन केल्यामुळे तेथील दोन पोलिसांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली होती.

दरम्यान, एरंडोल व धरणगाव येथील चोरलेल्या दोन दुचाकी चोपड्यात आलेल्या अल्पवयीन मुलाकडे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे अशरफ शेख यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी अशरफ शेख, दीपक शिंदे, इद्रीस पठाण व भारत पाटील यांचे पथक रवाना केले होते. या पथकाने या चोरट्याला मिळालेल्या माहितीच्या ठिकाणावरुनच ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक दुचाकी होती, अधिकच्या चौकशीत आणखी एक दुचाकी चोरल्याची कबुली देत दोन्ही दुचाकी काढून दिल्या. त्याशिवाय शिरपूर व धुळे येथेही घरफोडी व दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानं जळगावात विद्यार्थी आक्रमक

0
mpsc exam cancel

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं जळगावात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या संतप्त विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहेत. यावेळी 250 ते 300 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे येथील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

यावेळी संतप्त उमेदवारांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. एमपीएससी आमच्या हक्काची…नाही कुणाच्या बापाची अशा प्रकारच्या घोषणाबाजी यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या आहे. तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा झालीच पाहिजे, अशीही मागणी करण्यात आलीय.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. राज्य शासनानं परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यामंध्ये संतापाचं वातावरण आहे.   11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड सेंटरचे उद्घाटन

0
kovid center by keshavsmriti pratishthan

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । जळगाव शहरात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता नागरिकांच्या सोयीसाठी केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आज गुरुवारी करण्यात आले.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातून आढळून येत आहे. दरम्यान, शहरात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता नागरिकांच्या सोयीसाठी केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ आज गुरुवारी महापौर भारती सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, आयुक्त सतिश कुळकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, बांधकाम व्यावसायिक अनिस शहा, केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, संजय बिर्ला, डॉ. धर्मेंद्र पाटील, नंदू अडवाणी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कोविड सेंटर मध्ये ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून दाखल रुग्णांसाठी योगासन, सात्विक आहार, तद्न्य व प्रशिक्षीत डॉक्टरांचे उपचार, समुपदेशन करण्यात येणार आहे.

डॉ स्वप्निल पाटील व श्री सचिन महाजन हे पूर्णवेळ कोविड सेंटरमध्ये सेवा देणार असून उद्घाटन पूर्वी मान्यवरांनी कोविड सेंटर मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केली. आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात केशवस्मृती प्रतिष्ठान समाजातील गरजा ओळखुन त्याप्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. या कोविड केअर सेंटरचा जळगावकर नागरिकांना निश्चितच फायदा होणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी भानुदास येवलेकर, सागर येवले, भरत शर्मा, तेजस पाठक, हर्षल सुर्यवंशी, विजय पाटील. बापु सोनवणे, रोहन सोनगडा, किशोर गवळी, गोपाळ तगडपल्लेवार यांनी परिश्रम घेतले

ओंकारेश्वर मंदिरावर कोरोनाचे सावट ; भाविकांनी बाहेरूनच घेतले दर्शन

0
jalgaon omkareshwar temple darshan from outside

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील महाबळ येथील ओंकारेश्वर मंदिरात प्रवेश बंद असल्याने सर्व भाविकांनी मंदिरात न जाता बाहेरून दर्शन घेतले. बाहेरुनच दर्शन घ्यावे लागत असल्याने भाविकांमध्ये नाराजी दिसून आलीय.

 

महाशिवरात्र मोहत्सव असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आलेला नसून त्यांना बाहेरून मुख्यद्वारापासून दर्शन घ्यावे लागत आहे. दुपारी १२ वाजता अभिजित मुहूर्तावर १०८ निरांजन्याद्वारे महाआरती करण्यात आली.

 

भाविकांना आरतीचा लाभ घेता यावा यासाठी ओकारेश्वर देवस्थान चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे स्क्रीनवर प्रक्षेपण करण्यात आले. भाविकांनी मंदिराच्या बाहेरूनच सोशल डिस्टन्सिंग राखत आरतीत सहभाग घेतला. मंदिर दर्शनासाठी पहाटे ४ वाजता उघडण्यात आले. ते उद्या शुक्रवार दि. १२ वाजेच्या दुपारी १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असल्याचे  ओकारेश्वर देवस्थान चॅरीटेबल ट्रस्ट कळविण्यात आले आहे.

ब्रेकिंग : चाळीसगाव आणि चोपड्यात १३ आणि १४ मार्च जनता कर्फ्यू

0
Collector-Office-Jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा हात पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील चोपडा, चाळीसगाव व अमळनेर तालुक्यात रुग्ण संख्या वाढताना दिसून येत असल्याने या तिन्ही नगरपालिकांच्या हद्दीत निर्बंध लागू करण्यात आले आहे. दि. १३ मार्च पासून रात्री ते दिनांक १४ मार्चपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे.

जिल्ह्यात अनेक भागात रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. याकरिता आधीच जळगाव शहरात जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. आता जिल्ह्यातील चोपडा, चाळीसगाव व अमळनेर इत्यादी नगरपालिकांच्या हद्दीत १३ मार्च ते १४ मार्च पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

काय सुरु काय बंद राहणार?

1) सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील.

2) किराणा दुकाने, Non-Essential इतर सर्व दुकाने बंद राहतील.

3) किरकोळ भाजीपाला / फळे खरेदी-विक्री केंद्रे बंद राहतील.

4) शैक्षणिक संस्था/शाळा/महाविद्यालय, खाजगी कार्यालये बंद राहतील.

5) हॉटेल / रेस्टॉरंट (होम डिलीव्हरी, पार्सल वगळता) बंद राहतील.

6) सभा/ मेळावे/बैठका / धार्मिक स्थळे, सांस्कृतिक/ धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील. 7) शॉपींग मॉल्स / मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप बंद राहतील.

8) गार्डन, पार्क, बगीचे सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडा स्पर्था, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील.

9) पानटपरी, हातगाडयर, उघडयावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील.

वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निबंधातून दूध विक्री केंद्रे, वैद्यकीय उपचार व सेवा, मेडीकल स्टोअर्स, अॅम्ब्युलन्स सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटक यांना सुट देण्यात आली आहे.

भोलाणे येथील २२ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

0
crime

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । विष प्राशन केलेल्या २२ वर्षीय तरुणाचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज मध्यरात्री घडलीय. गोकुळ सुकदेव सपकाळे (वय-२२, रा. भोलाणे ता.जि.जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान,याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ सपकाळे हा भोलाणे येथे आई वडीलांसह वास्तव्यास होता. त्याचे भोलाणे शिवारात शेत असून शेती व मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान, बुधवार १० मार्च रोजी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास शेतात काम करत असतांना शेतासाठी लागणारे विषारी औषध गोकुळ सपकाळेने घेतले. विषारी औषध घेतल्यानंतर तश्याच अवस्थेत गावात आला. त्याचा चुलतभाऊ जगदीश सपकाळे आपण विषारी औषध घेतल्याचे सांगितले. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

मयताच्या पश्चात आई सुलाबाई, वडील सुकदेव सपकाळे, तुकाराम आणि मदन हे दोन मोठे भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. दोन्ही मोठे भाऊ विवाहित असून कुटुंबासह ठाणे येथे राहतात. तर गोकुळ हा अविवाहित असून आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर

0
kishor patil

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा – खाजोळा – सार्वे बु” येथील पुलाचे निर्माणासाठी २ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. 

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा – खाजोळा – सार्वे बु” तालुका हद्द सा. क्र. २२/८६०  टी. आर. ०९  येथील पुलाचे निर्माणासाठीचा प्रस्ताव पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील आमदार यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सादर केला होता. तो प्रस्ताव पास करत हसन मुश्रीफ यांनी २ कोटी रुपये निधीस मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला. प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त झालेली आहे.   

सदर विकासकामांना भरीव निधी उपलब्ध करून देणेकामी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आदेशानव्ये तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सहकार्यांने निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

एकनाथराव खडसेंच्या प्रयत्नांमुळे अल्पसंख्याक तंत्रनिकेतनसाठी ४ कोटींचा निधी मंजूर

0
eknath khadase

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । मुक्ताईनगर । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पाठपुरवढा करून शासकीय अल्पसंख्याक तंत्रनिकेतन मुक्ताईनगरसाठी सुमारे ४ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे. मिळालेल्या निधीतून तंत्रनिकेतनच्या कार्यशाळा व प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती मिळणार आहे.

एकनाथराव खडसे हे महसुल अल्पसंख्याक विकास मंत्री असताना त्यांनी अल्पसंख्याक समाजातील युवक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, त्यांच्यातून कुशल तंत्रज्ञ निर्माण व्हावे, यासाठी मुक्ताईनगर येथे अल्पसंख्याक तंत्रनिकेतन मंजुर केले होते. सालबर्डी शिवारात त्याचे काम सुरू असुन तंत्रनिकेतनची इमारत पूर्णत्वास येत आहे. परंतु, कोरोना व इतर बाबींमुळे निधी मिळण्यास अडचण येत होती. ही बाब लक्षात घेऊन एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे शासकीय अल्पसंख्याक तंत्रनिकेतन मुक्ताईनगर साठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.