⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

एकनाथराव खडसेंच्या प्रयत्नांमुळे अल्पसंख्याक तंत्रनिकेतनसाठी ४ कोटींचा निधी मंजूर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । मुक्ताईनगर । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पाठपुरवढा करून शासकीय अल्पसंख्याक तंत्रनिकेतन मुक्ताईनगरसाठी सुमारे ४ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे. मिळालेल्या निधीतून तंत्रनिकेतनच्या कार्यशाळा व प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती मिळणार आहे.

एकनाथराव खडसे हे महसुल अल्पसंख्याक विकास मंत्री असताना त्यांनी अल्पसंख्याक समाजातील युवक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, त्यांच्यातून कुशल तंत्रज्ञ निर्माण व्हावे, यासाठी मुक्ताईनगर येथे अल्पसंख्याक तंत्रनिकेतन मंजुर केले होते. सालबर्डी शिवारात त्याचे काम सुरू असुन तंत्रनिकेतनची इमारत पूर्णत्वास येत आहे. परंतु, कोरोना व इतर बाबींमुळे निधी मिळण्यास अडचण येत होती. ही बाब लक्षात घेऊन एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे शासकीय अल्पसंख्याक तंत्रनिकेतन मुक्ताईनगर साठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.