⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड सेंटरचे उद्घाटन

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड सेंटरचे उद्घाटन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । जळगाव शहरात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता नागरिकांच्या सोयीसाठी केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आज गुरुवारी करण्यात आले.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातून आढळून येत आहे. दरम्यान, शहरात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता नागरिकांच्या सोयीसाठी केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ आज गुरुवारी महापौर भारती सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, आयुक्त सतिश कुळकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, बांधकाम व्यावसायिक अनिस शहा, केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, संजय बिर्ला, डॉ. धर्मेंद्र पाटील, नंदू अडवाणी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कोविड सेंटर मध्ये ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून दाखल रुग्णांसाठी योगासन, सात्विक आहार, तद्न्य व प्रशिक्षीत डॉक्टरांचे उपचार, समुपदेशन करण्यात येणार आहे.

डॉ स्वप्निल पाटील व श्री सचिन महाजन हे पूर्णवेळ कोविड सेंटरमध्ये सेवा देणार असून उद्घाटन पूर्वी मान्यवरांनी कोविड सेंटर मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केली. आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात केशवस्मृती प्रतिष्ठान समाजातील गरजा ओळखुन त्याप्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. या कोविड केअर सेंटरचा जळगावकर नागरिकांना निश्चितच फायदा होणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी भानुदास येवलेकर, सागर येवले, भरत शर्मा, तेजस पाठक, हर्षल सुर्यवंशी, विजय पाटील. बापु सोनवणे, रोहन सोनगडा, किशोर गवळी, गोपाळ तगडपल्लेवार यांनी परिश्रम घेतले

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.