⁠ 
रविवार, मे 5, 2024

Padmalay Jalgaon- जगात एकमेव असणारे श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान

0
padmalaya erandol

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव (Jalgaon) शहरापासून केवळ ३० किलोमीटरवर असलेल्या एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र पद्मालय विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

पद्मालय मंदिर (Padmalay Jalgaon) भारतातील अडीच गणपती पिठांमध्ये आहे. हे मंदिर अर्धा पीठ म्हणून सन्मानित आहे. मंदिरामध्ये दोन स्वयंभू दोन गणेश मूर्ती आहेत – आमोद आणि प्रमोद. जगात केवळ पद्मालय येथे श्रींच्या दोन मूर्ती असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही मूर्तींमध्ये प्रवाळ आहेत आणि त्यांच्या उजव्या कवटीचे त्रिशंकण उजवीकडे आहे आणि दुसरा एक डाव्या बाजूला आहे. दोन्ही मूर्ती स्वयंभू आहेत हे मंदिर दगडांच्या आतील बाजूस बनले आहे.

padmalaya shri ganesha
श्री क्षेत्र पद्मालय येथील दोन स्वयंभू दोन गणेश मूर्ती – आमोद आणि प्रमोद

पद्मालय हा शब्द ‘पद्म’ आणि ‘आलय’ या दोन शब्दांचा मिलाफ आहे ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ कमळाचे घर असा होतो. मंदिराच्या जवळील तलाव कायम कमळाच्या फुलांनी भरलेला असतो. त्यामुळे मंदिरांला पद्ममालय असे म्हटले जाते.

पौराणिक कथांनुसार असे म्हटले जाते की भीमाने बकासुराला लढाईत पराभूत केले. लढाई नंतर तहान भागवण्यासाठी त्याने जमिनीवर कोपर धरला आणि तेथे तलाव तयार झाला. या ठिकाणाला भीमकुंड असे म्हटले जाते आणि ते पद्मालय जवळ आहे.

हे मंदिर टेकडीच्या वरती आहे आणि अनेक लहान मंदिरे वेढलेला आहे. येथे 440 कि.ग्रा. वजनाचा एक मोठा घंटा आहे. विविध औषधी वनस्पती आणि औषधी वनस्पती पद्मलाय मंदिराच्या परिसरात आढळतात.

padmalaya
श्री क्षेत्र पद्मालय येथील निसर्गरम्य परिसर

मंदिर पुरातन असून मंदिराची संपूर्ण बांधकामाची रचना ही हेमाडपंथी आहे. मंदिरात डाव्या-उजव्या सोडेंचे गणपती आहे. मंदिरासमोर भव्य घंटा असून प्रवेशद्वाराजवळ मोठे जाते आहे. मंदिरापासून सुमारे दोन ते तिन किलोमीटरच्या अंतरावरील घनदाट अरण्यात भिमकुंड आहे. श्री क्षेत्र पद्मालय जागरूक देवस्थान समजले जाते. त्यामुळे अंगारकी चतुर्थी तसेच संकष्ट चतुर्थीला येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते.

श्री क्षेत्र पद्मालायाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्यास मंदिर परिसरात विकास होवून पर्यटक संख्येत वाढ होईल. पर्यायाने स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. स्थानिक राजकारण्यांनी येथील विकासाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

श्री क्षेत्र पद्मालय येथे कसे जावे?

जळगाव, एरंडोल, पारोळा येथून श्री क्षेत्र पद्मालय येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. एरंडोल येथून अनेक खाजगी वाहने देखील उपलब्ध असतात. जळगाव व धरणगाव येथून सर्वाधिक जवळ असणारे रेल्वे स्थानक आहेत. तसेच विमानाने येण्यासाठी जळगाव व औरंगाबाद येथील विमानतळ जवळ आहेत.

लोकसेवा आयोग परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रवेशास बंदी

0
mpsc state service exam notification

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पुर्व परिक्षा 2021 जळगाव शहरात दि. 14 मार्च  2021 रोजी एकुण 16 उपकेंद्रावर सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 व दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेच्या वेळी गैरप्रकार होऊ नयेत. तसेच परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा उत्पन्न होवू नयेत.यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी जळगाव अभिजीत राऊत हे फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम (1)(2 व (3) खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार खालील प्रमाणे आदेश देत आहे.

दिनांक 14 मार्च 2021 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 व दुपारी 3.00 ते 5.00 वाजेपावेतो जळगाव शहरातील एकुण 16 परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. सदर आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस होमगार्ड यांचेसाठी लागु होणार नाही.

सर्व संबंधितांवर वैयक्तिकरित्या नोटीस बजाविण्यास पुरेसा कालावधी नसलेने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (2) नुसार एकतर्फी काढण्यात येत आहे. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

व्हिडीओ : जनता कर्फ्युचे पालन करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आवाहन

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि जनता कर्फ्युचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

जळगाव शहरातील व्यापारी आणि स्वंयसेवी संस्थांनीदेखील प्रशासनास सहकार्य करावे. कोरोना साखळी तोंडणे आणि संसर्ग कमी करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्यादृष्टीने जनता कर्फ्युचे पालन करणे आवश्यक आहे. नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करुन कोरोनाच्या विरुध्दच्या या लढ्यात आपला सहभाग नोंदवावा, असे पालकमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा तांडव सुरूच; आज आढळले ६०५ रुग्ण

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा तांडव दिवसेंदिवस वाढतच आहेत. आज देखील जळगाव जिल्ह्यात ६०५ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ५ रुग्ण मृत पावले आहेत.

आजच्या कोरोना रिपोर्टनुसार आजवर जिल्ह्यात एकुण ६५ हजार ७४३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५९ हजार १३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ५ हजार १८९ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज ०५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृताचा एकूण आकडा १४१५ वर गेला आहे.

आज जळगाव शहर-205, जळगाव ग्रामीण- 06 भुसावळ 53, अमळनेर-17, चोपडा-45, पाचोरा-00, भडगाव-17, धरणगाव-52, यावल-14 एरंडोल-30, जामनेर-18, रावेर-07, पारोळा-28, चाळीसगाव-89, मुक्ताईनगर-24, बोदवड-01, आणि इतर जिल्ह्यातील8 असे एकुण 605 बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जंगलात आग लावाल तर खबरदार; ड्रोनद्वारे आग लावणाऱ्यांवर प्रशासनाचे लक्ष

0
fire in forest

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । वन विभागामार्फत जंगलात आग लावणा-या संशयितांचा शोध घेण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा यांनी दिली आहेत.

वन विभागामार्फत जंगलातील वनवा विषयक विविध उपाययोजना करण्यात येत असून अत्याधुनिक ड्रोन तंत्राद्वारे देखरेख ठेवण्याबरोबरच स्थानिक रहिवासी व आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी नियमित बैठका भीतीचित्रे ध्वनिमुदफीती द्वारे जनजागृती करण्यात येत आहेत. वनवा नियंत्रणाकामी अग्निप्रतिबंधक मजुरांची संख्या वाढविण्यात आलेली आहे. वनवा लावणाऱ्या संशयितांना पकडून देणाऱ्यास पाच हजार रुपये इतके बक्षीस जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या लगत जंगलात आग लागणार नाही त्या समितीस अकरा हजाराचे पारितोषिक जाहीर करण्यात येत आहेत. वनवा नियंत्रणासाठी स्थानिक रहिवाशांच्या सक्रिय सहभागासाठी वन विभागाकडून विनम्र आवाहन करण्यात येत आहेत स्थानिक लोकप्रतिनिधीमध्ये वन विषयक संवेदनशीलता निर्माण करून जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत आहेत वनवा नियंत्रणासाठी फायर ब्लोअर ग्रास कटर या मशिनद्वारे जाळ रेषांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जंगल गोष्टीसाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची देखील मदत घेण्यात येत आहे. राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी वनसंरक्षण तथा जंगल वस्तीसाठी तैनात केली आहेत. वन व नियंत्रणासाठी शीघ्र प्रतिसाद पथके तयार केली असून आरोपी शोध व कारवाई करण्यात येत आहे अस्थाई संरक्षण कॅम्प उभारून वनवा देखरेख नियंत्रण व निगराणी करण्यात येत आहे. गस्ती पथक द्वारे जंगल क्षेत्राचे गोष्टीचे नियोजन वाढविण्यात आलेले आहेत अग्नि संवेदनशील परिसरात गौन वनोपजाचा संकलन व विक्रीवर निर्बंध घालण्याबाबत गंभीर विचार सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

स्थानिक रहिवाशांनी वनवा विषयक माहिती नजीकच्या स्थानिक वन कर्मचारी, अधिकाऱ्यांना देऊन वनवा नियंत्रणासाठी सक्रिय सहकार्य करावे. वनक्षेत्रात पर्यटनावेळी पर्यटकांनी जबाबदारीचे भान ठेवावे.

वणव्याची कारणे

जंगलात महू व उत्पादन अधिक लालसेने, गुराखी पुढील हंगामात अधिक गवत उत्पादन होणेच्या अंधश्रद्धेमुळे, लगतच्या भागातील शेत बांधावरील राब जाळणे, नकळत जंगलाच्या दिशेने ठिणगी उडाल्यास, वन्य प्राण्यांच्या शिकार करण्याच्या उद्देशाने, पर्यटक अभ्यागाच्या निष्काळजीपणाने ज्वलनशील पदार्थ वनक्षेत्रात फेकल्याने व अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने होतात.

तसेच वणव्याचे परिणाम मौल्यवान वृक्ष संपदेचा व पर्यावरणाचा ऱ्हास, जैवविविधतेची अपरिमित हानी, वन्यजीव व त्यांच्या आदिवासाची हानी होणे, तसेच जमिनीची धूप व उत्पादकता कमी होणे आणि आदिवासी बांधवांच्या दैनिक जीवन मनावर विपरीत परिणाम होणे व मानव-वन्यजीव संघर्ष असे परिणाम होतात.

तसेच जंगलात ज्वलनशील पदार्थ फेकू नये अथवा जवळ ठेवू नये आणि असे करणाऱ्या प्रवृत्तीस परावृत्त करावे व वनालगतच्या परिसरात अथवा वनात वनोपज संकलित करतांना पालापाचोळा जाळू नये रात्री उजेडासाठी थेंबाऐवजी बॅटरी घेऊन जावे वनालगत शेती बांधावरील काडीकचरा निष्काळजीपणाने जाळू नये अशा प्रकारची काळजी करणे गरजेचे आहे, असेही श्री. पद्मनाभा यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे

अत्यंत महत्त्वाचे : जनता कर्फ्यू दरम्यान जळगावात काय राहणार सुरु? काय राहणार बंद? घ्या जाणून…

0
Collector-Office-Jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार जळगाव शहरात ११ ते १५ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

जळगाव शहर महापालिका हद्दीत दिनांक ११ मार्च २०२१ रात्री ८ वाजेपासून दिनांक १५ मार्च २०२१ सकाळी ८ वाजेपर्यन्त हा जनता कर्फ्यू लागू असेल. या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात ‘एमपीएससी’च्या परीक्षा आहेत. त्यामुळे ती परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच त्याच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांना यातून सूट देणार आली आहे. परंतु त्यांना आपले आयकार्ड आणि हॉल तिकीट जवळ ठेवणे आवश्यक आहे.

जळगाव शहर मनपा हद्दीत काय सुरू राहणार याचा तपशील खालील प्रमाणे:

1) रेल्वे, बस, विमानसेवा
२) टक्सी, कब, रिक्षा केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेकरिता तसेच शासकीय, औद्योगिक आस्थापना
३) जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक रिक्षा केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा करतात तसेच शासकीय औद्योगिक आस्थापना कर्मचाऱ्यांची वाहने व परीक्षेला जाणारे विद्यार्थ्यांसाठी
४) चार चाकी वाहने केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवे करतात तसेच शासकीय औद्योगिक आस्थापना कर्मचाऱ्यांची वाहने परीक्षेला जाणारे विद्यार्थ्यांसाठी केवळ वन प्लस टू
५) दुचाकी वाहने केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी तसेच शासकीय औद्योगिक आस्थापना कर्मचारी यांची वाहने व परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (केवळ १+१)
६) मेडिकल स्टोअर्स
७) हॉस्पिटल्स/OPD/IPD/Medical Para, मेडिकल स्टाफ मेडिकल व वाहतूक ऍम्बुलन्स सेवा
८) दूध खरेदी विक्री केंद्र
९) कृषी संबंधित कामे
१०) औद्योगीक आस्थापने
११) जेथे पूर्वनियोजित परीक्षा आहे अशा शाळा महाविद्यालय
१२) कृषी सेवा केंद्रे पशुखाद्य केंद्रे पशुवैद्यकीय सेवा
१३) शासकीय कार्यालय (50% उपस्थित)
१४) बँका व वित्तीय संस्था पोस्टल सेवा
१५) पेट्रोल पंप सेवाची वाहने ऑटोरिक्षा तसेच शासकीय औद्योगिक आस्थापना कर्मचाऱ्यांची वाहने, परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची वाहने
१६) कुरियर
१७) गॅरेज वर्कशॉप्स
१८) सर्व प्रकारचे मालवाहतूक
१९) वृत्तपत्र मीडिया सेवा
२०) कोविड- १९ लसीकरण कार्यक्रम

जळगाव शहर मनपा हद्दीत काय बंद राहतील याचा तपशील खालील प्रमाणे:

१) शैक्षणिक संस्था शाळा महाविद्यालय विद्यापीठ
२) हॉटेल रेस्टॉरंट होम डिलीवरी पार्सल वगळता
३) किरकोळ भाजीपाला
४) धार्मिक स्थळे सभा बैठका
५) शासकीय खाजगी बांधकामे (मान्सूनपूर्व कामे वगळून)
६) शॉपिंग मॉल्स मार्केट
७) सलून
८) खाजगी कार्यालय
९) गार्डन पार्क बगीचे
१०) सिनेमागृहे नाट्यगृहे
११) व्यायामशाळा जलतरण तलाव
१२) क्रीडा स्पर्धा
१३) पानटपरी हात गाड्या उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री
१४) प्रदर्शने मेळावे संमेलने
१५) आठवडी बाजार
१६) सांस्कृतिक धार्मिक व तत्सम कार्यक्रम
१७) किराणा दुकाने नोन इसेन्शियल इतर सर्व दुकाने

हे देखील वाचा :  बिग ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात पाच दिवसाचा जनता कर्फ्यू

गीतांजली एक्स्प्रेसचा डबा रुळावरून घसरला

0
the coach of gitanjali express derailed

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । हावडाहून मुंबईकडे जाणार्‍या 02260 गीतांजली एक्स्प्रेसचा एक डबा (जनरेटर व्हॅन) रुळावरून घसरल्याची घटना मंगळवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास बोरगाव मंजू ते काटेपूर्णा दरम्यान घडली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या अपघातामुळे अप व डाऊन लाईनवरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली आपल्या नियमित वेळेवर धावत असताना सकाळी 11.15 वाजताचे दरम्यान काटेपूर्णा ते बोरगाव मंजू रेल्वे स्थानकादरम्यान आली असता या गाडीचा शेवटचा जनरेटर डबा (एसएलआर) अचानक रुळावरून घसरला. डबा घसरताच रेल्वे थांबली. रेल्वे अधिकारी व रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

बिग ब्रेकिंग : जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु

0
Collector-Office-Jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२०२१ । कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोनाची संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी जळगाव महानगरपालिका क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु लागू करण्यात आला असून नागरिकांनी त्यांचे स्वयंस्फुर्तीने पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

श्री.राऊत म्हणाले, गुरुवार 11 मार्च रात्री 8 वाजेपासून 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यु राहील. या कालावधीत शहरातील बाजारपेठा बंद राहतील. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. तसेच समाजसेवी संस्था, व्यापारी संस्था आणि लोकप्रतिनिधीनीदेखील याबाबतची मागणी केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा किंवा इतर शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित परीक्षा पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार होतील. परीक्षार्थींना अडचण होणार नाही. याबाबतची दक्षता घेण्यात येईल. सोमवारी सर्व दुकाने उघडण्यात येणार असून नागरीकांनी पुढील दोन दिवस गर्दी करु नये, तसेच वस्तुंचा साठा करु नये.

लसीकरण कार्यक्रम नियोजनानुसार सुरु राहील. सर्व निर्बंध जळगाव महानगरपालिका क्षेत्रासाठी असून आवश्यकतेनुसार तालुकास्तरावर त्यांची अंमलबजावणी नंतर करण्यात येईल. राज्यातील इतर भागातून होणारी प्रवासी वाहतूक सुरु राहील.

टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनाची सेवा केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेकरीता तसेच शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचारी याचे वाहने आणि परीक्षार्थीं विद्यार्थ्यांसाठी राहील. हॉस्पिटल, ओपीडी व रुग्णवाहिका सेवा सुरु राहतील. सर्व प्रकारची रुग्णालये, औषधांची दुकाने सुरु राहतील. दुध खेरदी-विक्री केंद्रे, कृर्षी, आणि औद्योगिक आस्थापना सुरु राहतील. शासकीय कार्यालये 50 टक्के उपस्थितीने सुरु राहतील.

पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनासाठी सुरु राहतील. रेल्वे,‍ विमानसेवा, मालवाहतुक सुरु राहील. तसेच कुरीयर,गॅरेज, वर्कशॉप, वृत्तपत्र, मिडीया सेवा,बँका व वित्तीय संस्था, पोस्टल सेवा,पशुखाद्य केंद्रे, पशुवैद्यकीय सेवा सुरु राहतील.

शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खाजगी क्लासेस, बाजारपेठेतील दुकाने बंद राहतील.सर्व प्रकारचे हॉटेल बंद राहतील, मात्र पार्सल सेवा सुरु राहील. किरकोळ भाजीपाला आणि फळ विक्री, धार्मिक स्थळे, सभा, मेळावे, बैठका, शासकीय ,खाजगी बांधकामे (मान्सून पूर्व कामे वगळून ) शॉपीग मॉल, मार्केट, किराणा दुकाने तसेच सर्व दुकाने, लिकर शॉप तसेच शॅाप, स्पा, सलून, खाजगी कार्यालये, गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, नाट्यगृहे, क्रिडा स्पर्धा, पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे, प्रदर्शने, मेळावे, संमेलन,आठवडी बाजार, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहील असे त्यांनी सांगितले.

ज्या विशिष्ट प्रवर्गाना जनता कर्फ्यु मधुन सुट देण्यात आलेली आहे. त्यांनी आपले सोबत कार्यालयाचे, आस्थापनाचे, शाळा, महाविद्यालयाचे ओळखपत्र तसेच 14 मार्च रोजी होणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिक्षेचे हॉल तिकिट सोबत बाळगणे अनिवार्य राहील असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

डॉ. मुढे म्हणाले जनता कर्फ्यु दरम्यान नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. कोरोनाची संपर्क साखळी थांबविण्यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक सुचनाचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


हे देखील वाचा : अत्यंत महत्त्वाचे : जनता कर्फ्यू दरम्यान जळगावात काय राहणार सुरु? काय राहणार बंद? घ्या जाणून….

कोरोना पार्श्वभूमीवर मुक्ताई यात्रोत्सव रद्द

0
muktabai

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर मुक्ताई यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी माघ कृ एकादशीला संत मुक्ताई मंदिर परिसरात लाखो भाविकांचा भक्तीचा मळा येथे फुलतो. यंदा मात्र यात्रोत्सव रद्द झाल्याने मंदिर परिसर सुनेसुने होते.  

 

महाराष्ट्रातील प्रमुख वारकरी संतपीठ असलेले संत मुक्ताबाई समाधीस्थळावर श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे सोमवार सुरू होणारा संत मुक्ताबाई-चांगदेव माघवारी महाशिवरात्र यात्रोत्सव सुरू होणार होता. दरवर्षी माघ कृ. विजया एकादशी या यात्रोत्सवचा महत्वपूर्ण दिवस असतो. यंदा मंगळवारी ९ मार्च रोजी विजया एकादशी होती. त्या अनुषंगाने येथे होणारी भाविक वारकऱ्यांच्या गर्दी लक्षात घेता प्रशासनाने आठवड्यापूर्वीच कोरोना संसर्जन्य आजाराच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पर्शवभूमीवर हा यात्रोत्सव सोहळा रद्द करण्याचा सूचना मंदिर प्रशासनाला दिल्या होत्या. त्यामुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.

 

संत मुक्ताबाई मंदिर व्यवस्थापनाला जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या सुचनेनुसार ९ ते ११ मार्च तीन दिवस मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे मानाच्या दिंड्याना आधी दिलेली परवानगीदेखील प्रशासनाने रद्द केली होती. मोठ्या प्रयत्नाअंती मनाच्या पाच दिंड्याना मंदिरात जाण्याची परवानगी मिळाली. यात वारकरी फडकरी कीर्तन महासंघ, गोमाजी महाराज संस्थान नागझिरी, या सह अन्य तीन मनाच्या दिंड्यानी मुक्ताई दरबारात हजेरी लावली होती तर मुक्ताई मंदिराकडे भाविकांनी येवू नये, म्हणून पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.