⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

कोरोना पार्श्वभूमीवर मुक्ताई यात्रोत्सव रद्द

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर मुक्ताई यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी माघ कृ एकादशीला संत मुक्ताई मंदिर परिसरात लाखो भाविकांचा भक्तीचा मळा येथे फुलतो. यंदा मात्र यात्रोत्सव रद्द झाल्याने मंदिर परिसर सुनेसुने होते.  

 

महाराष्ट्रातील प्रमुख वारकरी संतपीठ असलेले संत मुक्ताबाई समाधीस्थळावर श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे सोमवार सुरू होणारा संत मुक्ताबाई-चांगदेव माघवारी महाशिवरात्र यात्रोत्सव सुरू होणार होता. दरवर्षी माघ कृ. विजया एकादशी या यात्रोत्सवचा महत्वपूर्ण दिवस असतो. यंदा मंगळवारी ९ मार्च रोजी विजया एकादशी होती. त्या अनुषंगाने येथे होणारी भाविक वारकऱ्यांच्या गर्दी लक्षात घेता प्रशासनाने आठवड्यापूर्वीच कोरोना संसर्जन्य आजाराच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पर्शवभूमीवर हा यात्रोत्सव सोहळा रद्द करण्याचा सूचना मंदिर प्रशासनाला दिल्या होत्या. त्यामुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.

 

संत मुक्ताबाई मंदिर व्यवस्थापनाला जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या सुचनेनुसार ९ ते ११ मार्च तीन दिवस मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे मानाच्या दिंड्याना आधी दिलेली परवानगीदेखील प्रशासनाने रद्द केली होती. मोठ्या प्रयत्नाअंती मनाच्या पाच दिंड्याना मंदिरात जाण्याची परवानगी मिळाली. यात वारकरी फडकरी कीर्तन महासंघ, गोमाजी महाराज संस्थान नागझिरी, या सह अन्य तीन मनाच्या दिंड्यानी मुक्ताई दरबारात हजेरी लावली होती तर मुक्ताई मंदिराकडे भाविकांनी येवू नये, म्हणून पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.