⁠ 
शनिवार, मे 18, 2024

शासकीय रुग्णालयात कोरोनाग्रस्त महिलेचा पाय घसरून मृत्यू

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाळधी येथील ३८ वर्षीय महिलेचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.  दरम्यान, महिलेला योग्य उपचार मिळाले नसून, जीएमसीच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तिला दम लागत होता. त्यामुळे ही महिला दोन दिवसांपूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली होती. या महिलेला सी टू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान ही महिला पाय घसरून पडल्याने तिच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे; परंतु संबंधित महिलेवर योग्य उपचार झाले नसल्यामुळे जमिनीवर पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अारोप कुटंुबीयांनी केला आहे.

यात प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचाही आरोप नातेवाइकांनी केला. दरम्यान, रात्री प्रशासनाने समजावल्यानंतर तिचा मृतदेह शवागारमध्ये ठेवला आहे.

अधिकृत निवडी आधीच शहरात शिवसैनिकांची बॅनरबाजी सुरु

0
viraj kawdiya

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ ।  शहर मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया सभागृहात सुरू असून निवड होण्यापूर्वीच शिवसेनेच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी विजयाचे फलक लावले आहे.

मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शिवसेना कार्यकर्ते विराज कावडिया यांनी जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांच्या निवडीचे फलक लावले आहे. भगवा फडकला अशा शब्दात असलेले फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सरिता माळी यांच्यासह इतरांच्या नावाला भाजपची हरकत

0
jalgaon-manapa

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । मनपा महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया ऑनलाईन सुरू असून अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. माघारीची वेळ असताना भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. मनपातील स्वीकृत नगरसेवकांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्याचा अधिकार नाही. ऑनलाईन पद्धतीत ८७ सदस्य दिसून येत आहे त्यात सरिता माळी नामक महिला दिसून येत आहे. नेमका हा काय प्रकार आहे? अशी हरकत भाजप नगरसेवकांनी नोंदविली असून निवडणूक प्रक्रिया थांबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

भाजप पिठासन अधिकाऱ्यांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार

0
bjp jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडप्रसंगी शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या अर्जाला भाजपकडून हरकत घेण्यात आली. पिठासन अधिकाऱ्यांनी भाजपची हरकत फेटाळून लावत अर्ज वैध ठरवला आहे. दरम्यान, पिठासन अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा भाजप नगरसेविका ऍड.शुचिता हाडा यांनी दिला आहे. निवडीवरून सभागृहात जोरदार खडाजंगी सुरू आहे.

शिवसेनेच्या जयश्री महाजनांच्या अर्जाला भाजपकडून हरकत

0
jalgaon-manapa

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । शहर मनपाच्या महापौर आणि उपमहापौर निवडीला प्रारंभ झाला असून उमेदवारांचे अर्ज वाचून दाखवले जात आहे. शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा अर्ज वाचून दाखविल्यानंतर सूचक आणि अनुमोदक असलेले नितीन लढ्ढा आणि प्रशांत नाईक यांचे नाव गॅझेटनुसार नसल्याचे सांगत भाजपच्या नगरसेविका ऍड.शुचिता हाडा यांनी त्यावर हरकत घेतली आहे.

तसेच उमेदवार, सूचक, अनुमोदक यांच्या सह्या देखील तपासण्यात याव्या असेही त्यांनी सांगितले. याबाबतचे लेखी म्हणणे त्यांनी मांडले आहे. पिठासन अधिकाऱ्यांना हरकत नोंद करण्याचे त्यांनी सांगितले आहे.

राज्यात आजपासून चार दिवस पाऊस ; मध्य महाराष्ट्रासह ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

0
rain in maharashtra

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । राज्यात आजपासून चार दिवस पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. १८ ते २१ मार्चदरम्यान मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. त्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. 

राज्यात 18-21 मार्च 2021 दरम्यान मध्यम स्वरुपाचं पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. इतकंच नाहीतर भारतीय हवामान खात्याने (IMD) काही ठिकाणी विजा आणि गारपीटीची शक्यताही वर्तवली आहे. हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

तसेच औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नागपूर ,भंडारा, गोंदिया नांदेड आणि वर्धासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात गोव्यासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झालीय. आधीच बिघडलेली आर्थिक स्थिती आणि त्यात आता अवकाळी पावसाने शेतीवर होणारा विपरित परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनेक पिकांवर अवकाळी पावसाचा वाईट परिणा होतो आणि हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमीतकमी नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न सुरु केलेत.

ब्रेकिंग न्यूज : खुबचंद साहित्यांच्या भावाकडे दरोड्याचा प्रयत्न

0
khubchand sahitya

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । शहरातील इच्छादेवी चौकात असलेल्या स्वामी टॉवरमध्ये राहत असलेले बांधकाम व्यवसायिक खुबचंद साहित्या यांच्या भावाकडे सायंकाळी दरोड्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, दरोडेखोरांनी तलवार आणि बंदुकीचा धाक दाखविल्याची माहिती समोर येत आहे.

जळगावातील बांधकाम व्यावसायिक खूबचंद साहित्या यांचे भाऊ सतिष प्रेमचंद साहित्या हे इच्छादेवी चौकातील स्वामी टॉवरमध्ये राहतात. सायंकाळी ७.२० वाजता मास्क आणि रुमाल घातलेले चार तरुण त्यांच्या घरात घुसले. घरातील मुलांना धाक दाखवीत दरोड्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी मोबाईल हिसकावत काढता पाया घेतला मात्र बाहेर जाताना तो मोबाईल देखील फेकून दिल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचा ताफा हजर झाला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतल्याचे कळते.

ऑलनाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
organizing job fairs online

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगावतर्फे 22 व 23 मार्च 2021 या कालावधीत कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडुन www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर विविध शैक्षणिक पात्रतेची एकूण 115 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आलेली आहेत. यासाठी विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि ऑनलाईन आवेदन केलेल्या पात्र उमेदवारांच्या मुलाखती उद्योजकांच्या सोईनुसार शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील.

उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा महास्वयंम ॲप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे. एम्प्लॉयमेंट पेजवरील जॉब सीकर हा पर्याय निवडून आपला नोंदणी किंवा आधार क्रमांक व पासवर्डने लॉग ईन करावे आणि नियोजित दिवसाच्या रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करावी. या संधीचा अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा. नोंदणी करण्यास समस्या असल्यास कार्यालयीन वेळेत ( दूरध्वनी क्रमांक-0257-2239605) संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त डॉ. रा.म. कोल्हे यांनी केले आहे.

नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 16 मे रोजी

0
exam

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । केंद्र सरकार संचालित जवाहर नवोदय विद्यालय साकेगाव (भुसावळ) जिल्हा जळगाव येथील इयत्ता 6 वी च्या सन 2021-22 प्रवेशा करीता होणारी निवड चाचणी परीक्षा 10 एप्रिल ऐवजी 16 मे 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. 

प्रशासकीय कारणामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.  सर्व संबधीत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, अध्यापक, पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षेचे प्रवेश पत्र त्याच वेबसाईट navodaya.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करुन घ्यावे. अधीक माहितीसाठी 9404900916 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. खंडारे यांनी केले आहे.