MLC Election : भाजप करणार एकनाथराव खडसेंचा गेम? वाचा कुणी केला गौप्यस्फोट

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । विधान परिषदेच्या निवडणुकीत ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांना काहीही करून पाडण्यासाठी भाजपने व्युव्हरचना तयार केली आहे. दुसरे म्हणजे राष्ट्रवादीला स्वत:ची प्रतिष्ठा जपण्यासाठी खडसेंना निवडून आणावेच लागेल आणि तिसरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, स्वत:च्या राजकीय पुनर्वसनासाठी खडसेंना काहीही करुन विजयी होणे गरजेचे आहे. एकनाथराव खडसेंना पाडण्यासाठीच फडणवीसांनी पाचवा उमेदवार उभा केला असून यासाठी मास्टर प्लॅन रेडी असल्याचा दावा एमआयएमचे खा.इम्तियाज जलील यांनी केला आहे. (BJP’s Master Plan Ready to Overthrow Eknathrao Khadse)

हे देखील वाचा : MLC Election : खडसेंची क्रॉस वोटिंगवर मदार का राष्ट्रवादी मतांचा कोटा वाढविणार?

खा.इम्तियाज जलील म्हणाले की, एकनाथराव खडसे यांना पाडण्यासाठी भाजप पूर्ण ताकद लावत असून खडसे यांना उमेदवारी न देण्यासाठी भाजप ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी देखील तयार होती”, असा धक्कादायक दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत एमआयएमचे एक मतं काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना दिले जाईल. चंद्रकांत हांडोरे यांनी दलित समाजासाठी मोठे कार्य केले असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे जलील यांनी सांगितले. दरम्यान, उद्या शुक्रवारी पक्षाची मुंबईत बैठक असून त्या बैठकीत आम्ही अंतिम निर्णय घेऊ, असं जलील यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीचे एकनाथराव खडसे हे ज्येष्ठ नेते असून भाजपमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे खडसे यांना भाजपमधूनही क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन ते दोन आमदार खडसेंना मत देणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील एक आमदार खडसेंना मतदान करणार नाही, असा दावा देखील केला जात आहे. हे आमदार खडसे विरोधक म्हणून परिचित असून आता ते भाजपा नेते आमदार गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

हे देखील वाचा : MLC Election: विधान परिषद निवडणुकीत जळगावच्या तीन आमदारांची चर्चा राज्यभर का होतेय?

दुसरीकडे भाजप सध्या पंकजा मुंडे यांना डावलत असून त्यांना विधान परिषदेचे तिकीट देखील देण्यात न आल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक आमदार देखील खडसेंना क्रॉस वोटींग करण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. यामुळे या निवडणुकीत कोण वरचढ ठरत हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधानपरिषद निवडणुकीतही एक एक मताने पारडे फिरू शकते. अशा वेळी मोठ्या पक्षांपेक्षाही लहान पक्ष आणि अपक्षांच्या मताला मोठी किंमत असते. राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आपल्या हक्काच्या उमेदवारांवर लक्ष ठेवून असून कोणतीही जोखीम घेण्याच्या तयारीत नाही. एमयआएमने एक मत काँग्रेसला द्यायचं ठरवलेलं असेल तर दुसरं मत कुणाला जाईल, याविषयी आता मोठी उत्सुकता आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी एमआयएमने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत देऊन देखील महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला होता.