भाजपचा पुन्हा गेम : जळगाव मनपातील एका नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश

फेब्रुवारी 21, 2022 7:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । शहर मनपातील नगरसेवकांच्या इकडून तिकडे उड्या सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे ४ नगरसेवक गळाला लावल्यानंतर आज पुन्हा सेनेने भाजपचा गेम केला आहे. भाजपच्या एका नगरसेविकेने पालकमंत्री ना.गुलाबराब पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे.

bjp ruksana

भाजपचे एक-एक नगरसेवक शिवसेना आपल्या तंबूत ओढून घेत आहे. आपले नगरसेवक शिवसेनेत जात असले तरी भाजप अद्याप बिनधास्तच आहे. जळगाव मनपात बहुमतात असलेली भाजपा आज विरोध करण्यासाठी देखील सक्षम राहिली नाही. गेल्या आठवड्यात शिवसेनेने भाजपचे चार नगरसेवक आपल्याकडे ओढून घेतले होते तर आणखी दोघांनी ऐनवेळी शब्द बदलला होता. आम्ही भाजपात असल्याचा दावा करणाऱ्या दोन्ही नगरसेविकांनी महासभेप्रसंगी शिवसेनेच्या तंबूत बसूनच सहभाग नोंदविला होता.

सोमवारी अजिंठा विश्रामगृहात भाजपच्या प्रभाग १ च्या नगरसेविका रुकसानाबी गबलू खान यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. प्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे, विष्णू भंगाळे, नगरसेवक गणेश सोनवणे, चेतन सनकत, कुंदन काळे आदी उपस्थित होते.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now