जळगाव जिल्हागुन्हे

Jalgaon : पेट्रोलपंपाच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी १५ हजाराची लाच घेताना आरेखक जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचेचे प्रकार वाढत असल्याचं दिसत असून अशातच पेट्रोलपंपाच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आरेखकाला धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

lach jpg webp

ही कारवाई सोमवार, दि. २४ रोजी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या करण्यात आली. वासुदेव धोंडू पाथरवट (वय ५३, रा. विश्वकर्मा भवन, मोहित नगर, जळगाव रोड, भुसावळ) असं लाचखोराचे नाव असून या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे

कार्यालयात पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळावे, याकरिता तक्रारदाराने अर्ज दाखल केला होता. यावेळी आरेखक वासुदेव पाथरवट याने प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता सुरुवातीला दोन हजार आणि काम झाल्यावर १५ हजार द्यावे लागतील, अशी मागणी केली होती.

याबाबत तक्रार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने सापळा रचून वासुदेव पाथरवट याला सोमवारी १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button