जळगाव लाईव्ह न्यूज । हल्लीच्या काळात फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विविध प्रकारे होणाऱ्या फसवणुकीद्वारे अनेकांना गंडविण्यात आले. अशीच एक घटना समोर आलीय. ज्यात कोणाला नायब तहसीलदार तर कोणाला क्लास वन ऑफिसर सांगून धरणगावच्या एका तरुणाने लग्नाच्या नावाने अनेक तरुणींना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आलाय. निनाद विनोद कापुरे असं त्याच नाव असून त्याच्याविरुद्ध नाशिक आणि फलटण येथील तरुणींनी पोलिस अधीक्षकांना भेटून लेखी तक्रार केली. यांनतर तरुणावर फलटण व नाशिकला गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अद्याप अटक झालेली नाही.

दोघा पीडित तरुणींनी दिलेल्या माहितीनुसार, निनाद कापुरे याने मॅरेज ब्युरो या ऑनलाइन साइटवरून आमच्याशी संपर्क साधला. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून तसेच आपल्याला पदोन्नती मिळाली असून, पुणे येथे तहसीलदार पदावर नियुक्ती होत असल्याने पैशांची गरज असल्याचे सांगून आई-वडिलांच्या संमतीने त्याने नाशिकच्या तरुणीकडून ७ लाख तर फलटणच्या डॉक्टर तरुणीकडून ८ लाख रुपये उकळले.

निनाद हा आधीच विवाहित असून, तिचीही कोर्टात केस सुरू असल्याचे समजल्याने या दोन्ही तरुणींनी तक्रारी केल्यावरून त्याच्याविरुद्ध फलटण व नाशिकला गुन्हा दाखल झाला. फलटणच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली असून, नाशिकच्या गुन्ह्यात अटक झालेली नाही. त्यामुळे त्याला अटक व्हावी, उकळलेली रक्कम परत मिळावी व भविष्यात आणखी तरुणींची फसवणूक होऊ नये यासाठी पोलिस अधीक्षकांना भेटून तक्रार केल्याचे या तरुणींनी सांगितले.
आतापर्यंत ६ तरुणींना फसवले
सरकारी लाल दिव्याच्या वाहनातील तसेच तहसीलदारांच्या खुर्चीवर बसलेले फोटो या तरुणींना त्याने पाठवले आहेत. हे सर्व फोटो व पैशाचे पुरावे जळगावात पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आले आहेत. आतापर्यंत त्याने अशाच प्रकारे सहा तरुणींना फसवले असल्याचेया तरुणींनी सांगितले.












