⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

सैनिकांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी ; जळगावमध्ये पार पडला अनोखा कार्यक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ नोव्हेंबर २०२३ | भारत विकास परिषदेने देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी हा उपक्रम राबवला. जिल्हाभरातील १२ शहीद जवानांचे कुटुंबीय रविवारी मायादेवी नगरातील रोटरी भवनात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान साडी-चोळी देऊन करण्यात आला.

सैनिकांच्या वीर माता व वीर पत्नींनी प्रमुख अतिथीसह भारत विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना “भाऊबीज म्हणून औक्षण केले. या भावांनी शहीद जवानांच्या कुटुंबातील छाया वारुड, मीराबाई मनोरे, रत्नाबाई धनगर, ज्योती पाटील, प्रतिभा माळी, छायाबाई सोनवणे, सुरेखा देशमुख, रमेश पवार, भावना पाटील, सुनंदा पाटील, कविता जाधव यांचा गौरव केला गेला. सैनिकांच्या कुटुंबीयांतून चिन्मयी पाटील, ज्योती पाटील, भावना पाटील, दिगंबर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

आपल्या सैनिकांमुळेच आपण सुखाची दिवाळी करीत असतो. मात्र, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांची भारत विकास परिषदेने आठवण ठेवली, यामुळे त्यांना आनंदाचे क्षण अनुभवता आल्याचे तहसीलदार विजय बनसोडे यांनी मार्गदर्शनातून सांगितले. तर सैनिकांच्या घरात आर्थिक सुबत्ता नसते. अशा जवानांच्या कुटुंबीयांना जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड, शासन व समाजाने देखील सहकार्यासह संवाद ठेवणे गरजेचे असल्याचे मत माजी नौसेना अधिकारी हरीश यादव यांनी व्यक्त केले.

भारत विकास परिषदेच्या कार्याची माहिती अध्यक्ष महेश जडिऐ यांनी दिली. प्रास्ताविक तुषार तोतला यांनी केले. प्रांजली रस्से यांनी वंदेमातरम्‌ सादर केले. यावेळी माजी महापौर सीमा भोळे, रा. स्व. संघाचे महानगर संघचालक उज्ज्वल चौधरी, सचिव उमेश पाटील, डॉ.सुरेश अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील याज्ञिक यांनी केले. आभार सचिव उमेश पाटील यांनी मानले.

bharat vikas parishad 1
सैनिकांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी ; जळगावमध्ये पार पडला अनोखा कार्यक्रम 1