ब्रेकिंग ! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह भाजप महिला खासदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं प्रकरण काय?

एप्रिल 18, 2026 5:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२६ । दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आलीय. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपच्या महिला खासदारांनी संसदेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली.

raksha khadse

भाजप खासदारांनी आंदोलन करून विरोधकांवर टीका केली. परंतु संसदेच्या आवारात आंदोल केल्याप्रकरणी पोलिसांनी आज शनिवारी खासदार केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार बन्सुरी स्वराज यांना ताब्यात घेतलं आहे.

नेमकी घटना काय?

शुक्रवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले होते, मात्र बहुमताअभावी हे विधेयक नामंजूर झाले. विधेयक पडल्याचे स्पष्ट होताच भाजपच्या महिला खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांनी जाणीवपूर्वक विधेयक रोखल्याचा आरोप करत रक्षा खडसे, बन्सुरी स्वराज यांच्यासह अनेक महिला खासदारांनी संसदेच्या आवारातच ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली होती.

संसदेच्या आवारात आंदोलनास बंदी

संसदेच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा निदर्शने करण्यास कायद्याने बंदी आहे. या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी आज ही कारवाई केली. रक्षा खडसे आणि बन्सुरी स्वराज या संसदेच्या गेटजवळ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now