---Advertisement---
बातम्या गुन्हे जळगाव जिल्हा भुसावळ

कारची धडक लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू; भुसावळ येथील दुर्दैवी घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| ३ ऑगस्ट २०२३। भुसावळ तालुक्यातील पिंप्री सेकम शिवारातील क्रेशर मशीनसमोरील रोडवर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon mahanagar palika 24

सुधाकर बुधाजी वानखेडे (वय-५६) रा. आंबेडकर नगर, भुसावळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुधाकर वानखेडे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. बुधवार २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सुधाकर वानखेडे हे त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच २८ -४६४९) ने भुसावळ तालुक्यातील पिंप्री सेकम नजीकच्या क्रेशर मशीन समोरून जात असतांना समोरून येणारी कार क्रमांक (एमएच १९ बीयू ७१३१) ने जोरदार धडक दिली.

---Advertisement---

या धडकेत सुधाकर वानखेडे यांना डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री ११ वाजता कारवरील अज्ञात चालकाविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुजा अंधारे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---