⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

मोठी बातमी : ऑनलाईन पीक पाहणीची अट रद्द

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ ।ऑनलाईन पीक पाहणीची अट मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे रद्द करण्यात आल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ई पीक नोंदणीची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर होती मात्र ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी होत नसल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी केल्या होत्या तसेच मुक्ताईनगर, बोदवड तसेच रावेर तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याशी पत्राद्वारे मुदत वाढीची मागणी आमदारांनी केली होती

शिवाय राज्याचे महसूल मंत्री यांच्याशी देखील भ्रमणध्वनीवरून मुदत वाढीची मागणी करीत ऑनलाईन पीक पाहणी अट रद्द करण्याची मागणी केल्याने महसूल मंत्र्यांनी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी बंधनकारक नसल्याचे पत्र काढले आहे.

महसूल मंत्री यांनी आमदारांच्या तक्रारीची दखल घेत तत्काळ जिल्हाधिकारी यांना पत्रकाद्वारे पीक पेरा ऑनलाईन अट रद्द करण्याचे आदेश पाठवले असून जिल्हाधिकार्‍यांनीदेखील अशा स्वरूपाचे पत्रक काढल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनीदेखील शेतकर्‍यांना पीक पेरा नोंदणी बंधनकारक नसल्याचे कळवले आहे.