⁠ 
बुधवार, एप्रिल 17, 2024

कन्या दिनाचे औचित्य साधून भरारी फाउंडेशन व के.के.कॅन्स तर्फे पंधरा मुलींना सायकल वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२१ । अनेक दात्यांनी आपल्या घरच्या जुन्या सायकली भरारी फाऊंडेशनला हाकेला प्रतिसाद देत उपलब्ध करून दिल्या. भरारी संस्थेने त्या सायकली दुरुस्त करून घेतल्या. जिल्हाभरातील गरीब, गरजू व होतकरू अशा पंधरा विद्यार्थ्यांना शोधून त्यांना सायकली उपलब्ध करून दिल्या. अनेक विद्यार्थ्यांना बस, रिक्षाचा खर्च परवडत नाही. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये हा यामागचा हेतू आहे.

दोन गरजू, मजूर व्यक्तीही या उपक्रमाच्या लाभार्थी ठरल्या. त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.

भरारी फाऊंडेशनला या उपक्रमात लक्ष्मीनारायण मनियार यानी दोन नवीन साइकल उपलब्ध करुन दिल्या.दिलीप चोपड़ा,गजानन मालपुरे,बाळासाहेब सूर्यवंशी,कृष्णा श्रीवास्तव, संजय सालुंखे,अर्चना जाधव,अभय मुथा, बाली वर्मा,नीलेश ललवानी,संगीता धनगर,ज्योति राजपूत  यानी प्रत्येकी एक साइकल उपलब्ध करुन दिली.

रजनीकांत  कोठारी यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. व ज्यांच्याकडे जुन्या सायकली पडून असतील, फारशा वापरात नसतील त्यांनी त्या भरारी फौंडेशनकडे आणून द्याव्यात असे आवाहन केले. यावेळी महेंद्र कोठारी,रविन्द्र लढा,बाळासाहेब सूर्यवंशी,अमर कुकरेजा,डॉ. प्रीति दोषी,सपन झुनझुनवाला,आदर्श कोठारी,जय दोषी,चंद्रशेखर राजपूत व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रास्ताविक दीपक परदेशी यांनी तर कार्यक्रमाची भूमिका व आभार रामचंद्र पाटील यांनी मानले. अमित भाटिया यांनी कार्यक्रमासाठी पद्मावती मंगल कार्यालय उपलब्ध करुण दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रितेश लिमड़ा विनोद ढगे,नीलेश झोपे,सागर पगारिया,  दीपक विधाते, सागर परदेशी,विक्रांत चौधरी,यानी परिश्रम घेतले.