बीएचआर घोटाळा प्रकरण : आरोपी विवेक ठाकरेचा जामीन अर्ज फेटाळला

एप्रिल 3, 2021 8:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२१ । भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या (बीएचआर) कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी विवेक ठाकरेचा जामीन अर्ज पुणे येथील विशेष न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे.

vivek thakare bhr

राज्यात गाजलेल्या बीएचआर घोटाळाप्रकरणी पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात रंजना घोरपडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशी वर्ग करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यासह पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावात येवून सीए महावीर जैन, प्रकाश वाणी, विवेक ठाकरे, धरम साखला, कमलाकर कोळी यांना अटक केली होती तर २२ जानेवारी २०२१ रोजी सुनील झंवर याचा मुलगा सूरज याला अटक केली.

बीएचआर प्रकरणातील ठेविदार यांचा दलाल विवेक ठाकरे याने आज पुणे येथील विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. आज न्यायालयात युक्तीवाद होवून न्यायालयाने ठाकरेचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now