---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर

सावधान! जळगावच्या उच्चशिक्षित तरुणाला लावला १२ लाखाचा ऑनलाईन चुना…

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२४ । ऑनलाइन गेमिंग च्या माध्यमातून अनेक तरुण हे ऑनलाइन फ्रॉडचा शिकार होत आहेत. मेहनत न करता मिळणाऱ्या पैशांच्या लोभाने अनेक तरुण हे कित्येक पैसे ऑनलाइन गेमिंग वर गुंतवणूक करताना दिसत आहेत. परंतु आता हे ऑनलाइन गेमिंग अनेक तरुणांचे आयुष्य उध्वस्त करत आहे. असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यातील बांभोरी येथे उघडकीस आला आहे. बांभोरी येथील ३१ वर्षीय अभियांत्रिकी पदवीधर चे शिक्षण असलेला तरुण राहुल भागवत सोनवणे यांनी झटपट पैसे कमवण्याच्या लोभाने वडिलांच्या निवृत्तीचे १२ लाख रुपये या ऑनलाइन टास्कच्या माध्यमातून गुंतवणूक करून सायबर गुन्ह्याचा शिकार झाला आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले परंतु नोकरी नसल्याने राहुल याने ऑनलाईन टास्क घेऊन झटपट पैसे कमवायला सुरुवात केली, हे सातत्याने करत असताना त्याला ऑनलाइन गेमिंग मध्ये पैसे गुंतवण्याचा लोभ लागला. राहुल भागवत सोनवणे या अभियांत्रिकी पदवीधर तरुणाच्या मोबाईलवर ३१ मे रोजी व्हाट्सअप क्रमांक ९७९३४४१३१३ तसेच टेलिग्राम वरील @Linda Marty८९८५ या आयडी क्रमांकावरून संपर्क करण्यात आला. त्याला ऑनलाईन टास्क देऊन व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्यास प्रत्येकी व्हिडिओ मागे १२३ रुपये मिळतील असे सांगण्यात आले. सुरुवातीला राहुलने या टास्कमध्ये हजार रुपये गुंतवले, आणि त्याचा मोबदला म्हणून त्याला १३०० रुपये परत मिळाले. मोबदला जास्त मिळत असल्याने पैसे वाढत जात आहेत असे त्याला वाटत होते, त्यानंतर त्याने जास्त रक्कम गुंतवणूक करायला सुरुवात केली.

fraud jpg webp

त्याचे वडील एसटी महामंडळातून काही दिवसांपूर्वीच निवृत्त झाले होते. वडिलांचा पीएफ व ग्रॅज्युएट चे बँक खाते तोच सांभाळत होता. त्यामुळे वडिलांच्या बँक खात्याचे सगळे डिटेल्स त्याच्याकडे होते. याचाच गैरफायदा घेत त्याने वडिलांच्या एसबीआय बँक खात्यातून ११,४३,९९९ रू अवघ्या सहा दिवसात गुंतवले. एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने लगेचच ६ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता सायबर पोलीसात जाऊन फर्याद दिली व फसवणूक झालेल्या अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---