⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

खंडेराव महाराज यात्रोत्सव : तीस वर्षांपासून खंडित बारागाड्या कार्यक्रमाचा यंदापासून पुन्हा प्रारंभ

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । गेल्या तीस वर्षांपासून खंडित असलेल्या नशिराबाद गावातील पेठ भागातील बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम यावर्षापासून प्रारंभ होत आहे. भगत नसल्यामुळे तीस वर्षांपासून हा कार्यक्रम होत नव्हता. यंदा तो 31 मे रोजी होणार आहे. भगत उमेश दिलीप धनगर हे बारागाड्या ओढतील. बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमानिमित्त कठडे मिरवणूक काढण्यात येणार आहे. बारागाड्यांचा कार्यक्रम सायंकाळी सहाला होईल.

कार्यक्रम गावातील पेठ भागातील उमाळे रस्त्यालगत असलेल्या श्री खंडेराव महाराज मंदिराजवळ होईल. तत्पूर्वी मूर्तीस पंचामृत महाभिषेक होईल. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे. उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कमलाकर पाटील, उपाध्यक्षपदी मनोज नाथ, खजिनदारपदी राजू मंडपे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्यांमध्ये विकास धनगर, हर्षल मंडपे, बाळ धनगर, प्रवीण धनगर, विजय पाटील, घनश्याम पाटील, रवींद्र नाथ, संतोष माळी, गणेश कोळी, गजानन धनगर, ज्ञानेश्वर धनगर, भगवान धनगर, नरेंद्र लोणारी भुषण धनगर समाधान चव्हाण सतिश नाथ मुन्ना चिरावडे यांचा समावेश आहे.