बापरे : जळगावात जप्त झाला तब्बल इतक्या ‘लाखांचा’ गुटखा

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ मे २०२३ | एमआयडीसीत हद्दीतील एका गोदामात त्याचा साठा करण्यात आल्याची माहिती यंत्रणेलला मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री पथकाने छापा टत्तकत साडेचार लाखांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त केल्याने गुटखा विक्री करणार्या गोटात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी त्रिकूटाला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी संशयित अमोल तुकाराम वनडोळे (28, रा.शिरसोली प्र.बो.), विनायक शालिक कोळी (47, रा.वाल्मिक नगर), भूषण दादा तांबे (38, रा.शिवाजी नगर) यांना अटक करण्यात आली.
गोदामातून एक लाख 71 हजार रुपये किंमतीचे पानमसाल्याची एक हजार 140 पाकिटे आणि सुंगधित तंबाखूची एक हजार 140 पाकिटे, एक लाख 38 हजार रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याची 700 पाकिटे, 15 हजार 400 रुपये किंमतीची व्ही-1 तंबाखूचे 700 पाकिटे तसेच एक लाख 28 हजार 640 रुपये किंमतीचे आरएमडी पानमसाल्याचे 268 पाकिटे मिळून चार लाख 53 हजार 640 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधीन उपअधीक्षक आप्पासो पवार, एमआयडीसीचे पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, दीपक चौधरी, दत्तात्रय बडगुजर, विठ्ठल धनगर, गोपाल पाटील, महेश पवार, हितेश महाजन, भगवान सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.