नोकरी संधी

रेल्वेत पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 3548 जागांवर भरती

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळामार्फत (RRB) गैर-तांत्रिक लोकप्रिय श्रेणी अर्थात NTPC Graduate अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. दिलेल्या माहितीनुसार, या भरतीमध्ये एकूण ३,५४८ रिक्त जागा असून, इच्छुक उमेदवारांना ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी पात्रता तपासून अर्ज करण्याची तयारी करावी.

रिक्त पदांचा तपशील

रेल्वेच्या या भरतीमध्ये एकूण चार प्रकारच्या पदांचा समावेश आहे. त्यामध्ये मालगाडी व्यवस्थापक पदासाठी सर्वात जास्त २७५० रिक्त जागा आहेत. वरिष्ठ लिपिक, टंकलेखक पदासाठी ३७१, कनिष्ठ लेखा सहाय्यक म्हणजेच टंकलेखक पदासाठी ३००, तर मुख्य वाणिज्यिक म्हणजे तिकीट पर्यवेक्षक पदासाठी १२७ जागा आहेत.

दरमहा २९,२०० ते ३५,४०० रुपये मूळ वेतन

निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. मुख्य वाणिज्यिक तथा तिकीट पर्यवेक्षक या पदासाठी वेतन स्तर ६ नुसार दरमहा ३५,४०० रुपये मूळ वेतन निश्चित आहे. तर मालगाडी व्यवस्थापक, वरिष्ठ लिपिक तथा टंकलेखक आणि कनिष्ठ लेखा सहाय्यक तथा टंकलेखक या पदांसाठी वेतन स्तर ५ नुसार दरमहा २९,२०० रुपये मूळ वेतन मिळेल. याशिवाय नियमानुसार लागू असलेले भत्तेही मिळू शकतात.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेबाबत दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२७ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना लागू असलेल्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळू शकते. पदनिहाय पात्रता आणि इतर अटींसाठी अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे.

अर्ज कधीपर्यंत करता येणार?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. परीक्षा शुल्क भरण्यासाठी ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ९ ते १८ नोव्हेंबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे.

अर्ज कुठे करायचा?

RRB अधिकृत संकेतस्थळ: https://rrb.indianrailways.gov.in
ऑनलाइन अर्ज पोर्टल: https://www.rrbapply.gov.in

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button