नोकरी संधी

रेल्वेत 12वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी! 1 हजार 688 जागांची भरती सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी विशेष । तुम्हीही बारावी पास असाल आणि रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) पदवीपूर्व प्रवर्गातील भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण १ हजार ६८८ रिक्त पदे भरली जाणार आहे.

बारावी उत्तीर्ण उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ नोव्हेंबर २०२६ आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?

RRB NTPC अंडरग्रॅज्युएट भरती २०२६ अंतर्गत विविध पदांचा समावेश आहे.

अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट: २०० पदे
कमर्शियल कम तिकीट क्लर्क: ७०० पदे
ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट: ६०० पदे
ट्रेन्स क्लर्क: १८८ पदे

शैक्षणिक पात्रता काय?

उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून बारावी अर्थात १०+२ परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. टायपिस्ट पदांसाठी हिंदी किंवा इंग्रजी टायपिंगचे ज्ञान आणि निर्धारित टायपिंग चाचणीची पात्रता आवश्यक असू शकते.

उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३३ वर्षे असावे. वयाची गणना १ जानेवारी २०२७ या तारखेनुसार केली जाणार असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळू शकते.

अर्ज शुल्क किती?

भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. दिलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये, तर एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी २५० रुपये आहे.

CBT-1 परीक्षा दिल्यानंतर पात्र उमेदवारांना नियमानुसार शुल्काचा काही भाग परत केला जाऊ शकतो. दिलेल्या माहितीत सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ४०० रुपये परताव्याचा उल्लेख आहे. इतर पात्र प्रवर्गांसाठी परताव्याची अट आणि रक्कम अधिकृत अधिसूचनेत तपासावी.

निवड प्रक्रिया कशी असेल?

संगणक आधारित परीक्षा (CBT-1)
दुसरी संगणक आधारित परीक्षा (CBT-2)
लागू पदांसाठी टायपिंग किंवा कौशल्य चाचणी
कागदपत्रांची पडताळणी
वैद्यकीय तपासणी

प्रत्येक टप्प्यातील पात्रता, परीक्षेचे स्वरूप आणि गुणांकनासंबंधी सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत दिली जाईल.

असा करा ऑनलाइन अर्ज

१. सर्वप्रथम RRB अर्ज पोर्टल उघडा.
२. संबंधित NTPC अंडरग्रॅज्युएट भरतीची लिंक निवडा.
३. आवश्यक असल्यास नोंदणी करून लॉगिन करा.
४. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती भरा.
५. लागू असलेले अर्ज शुल्क भरा.
६. अर्जातील माहिती तपासून अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत जतन करा.

जाहिरात (PDF)
Undergraduate: Click Here
Online अर्ज

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button