बँक ऑफ बडोदामध्ये मोठी पदभरती, लगेचच करा अर्ज

मार्च 8, 2022 5:08 PM

बँक ऑफ बडोदामध्ये 42 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेस्थळावर जारी केली आहे. फसवणूक जोखीम आणि जोखीम व्यवस्थापन (Fraud Risk and Risk Management Department) विभागात पदांची भरती केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी या पदांसाठी अर्ज करावेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.

bank of baroda jpg webp

रिक्त जागा तपशील

या भरती मोहिमेअंतर्गत 42 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

परीक्षा फी : सामान्य / EWS / OBC श्रेणीतील उमेदवारांना 600 रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल. तर SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवारांना 100 रुपये भरावे लागतील.

अशा प्रकारे अर्ज करा :

अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in ला भेट द्या.
आता उमेदवार करिअर टॅब अंतर्गत ‘सध्याच्या संधी’ वर क्लिक करा.
फसवणूक जोखीम आणि जोखीम व्यवस्थापन विभागासाठी नियमित/कंत्राटी आधारावर विविध पदांसाठी भरती. “आता अर्ज करा” वर क्लिक करा.
अर्ज भरा, पोस्ट निवडा, कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.
अर्ज सबमिट करा.
उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट भविष्यातील संदर्भासाठी त्यांच्याकडे ठेवावी.

अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2022

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now