⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | वीज वाहिन्यांच्या शॉर्टसर्किटमुळे केळीबागेला आग; १५ लाखांचे नुकसान

वीज वाहिन्यांच्या शॉर्टसर्किटमुळे केळीबागेला आग; १५ लाखांचे नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील दहिगाव येथील शेतकऱ्याच्या साकळी शिवारातील केळी बागेला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. त्यात सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

अधिक माहिती अशी की, दहिगाव येथील महेश पांडुरंग पाटील यांची साकळी शिवारात शेती आहे. तेथे त्यांनी साडेसात हजार खोड केळी लागवड केली आहे. यातील काही प्रमाणात केळीची कापणी झाली होती. पिल बाग उभा होता. या पिल बागाला पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी शेतात पाइपलाइन टाकली होती. या शेतात मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. त्यात केळी पिकासह पाइपलाइन, ठिबक नळ्या जळून खाक झाल्या. ही आग शेतात लोंबकळलेल्या वीज वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागली, असे शेतकऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेत सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. वीज वितरण कंपनी, महसूल विभागाला कळवण्यात आले. केळीची कापणी झाली होती. पिल बाग उभा होता. या पिल बागाला पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी शेतात पाइपलाइन टाकली होती. या शेतात मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. त्यात केळी पिकासह पाइपलाइन, ठिबक नळ्या जळून खाक झाल्या. ही आग शेतात लोंबकळलेल्या वीज वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागली, असे शेतकऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेत सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. वीज वितरण कंपनी, महसूल विभागाला कळवण्यात आले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह