⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

झाडावरच का पिकतेयं केळी? निसर्गाच्या पाठोपाठ व्यापार्‍यांचीही मनमानी; वाचा सविस्तर…

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । जळगाव जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर आहे. येथील केळीला केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठी मागणी असते. मात्र जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांचा सामना करत आहेत.गेल्या तीन महिन्यांपासून केळीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

जिल्ह्यात केळी तीन रुपये प्रति किलोने परवडत नसतानाही शेतकरी केळी व्यापार्‍यांना देण्यास तयार आहेत. मात्र केळी काढण्यास तयार नसल्याने केळीचे घड झाडावर पिकत आहे. झाडाला लागणारी केळी काढायला सुद्धा परवडत नाही म्हणून आता अशीच पिकून खराब होऊ लागलीय. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक नुकसानाला समोर जावे लागत आहे.

दरम्यान, दोन दिवसापूर्वी भडगाव तालुक्यातील वढदे गावातील शेतकऱ्यांनी त्यांचे केळीचे पीक नष्ट केले. केळीला भाव मिळाला नाही, शिवाय लागवडीचाही खर्च न निघाल्याने हताश होऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.जुबलसिंग पाटील आणि संजय पाटील अशी शेतकऱ्यांची नावे आहेत.व्याजाचे पैसे घेऊन शेतकर्‍यांनी आपल्या शेतात टिश्यूकल्चर केळी लावली.लागवडीवर लाखो रुपयांचा खर्च केला.पण केळीला हवा तसा भाव न मिळाल्याने लागवडीचा खर्चही निघाला नाही. दीड लाखांपर्यंत खर्च केला, मात्र हातात एक रुपयासुद्धा आला नाहीमोठ्या नुकसानीमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातली केळीवर जेसीबी फिरवून दुसर्‍या पीक लागवडीसाठी शेत तयार केले.१ हजार ५०० रुपये तास याप्रमाणे जेसीबी लावून सर्व शेतातील केळी उपटून फेकली.नैराश्यातून शेतकऱ्यांनी सर्व केळीवर जेसीबी फिरवले

लागवडीपासून एकरी ५० ते ६० हजार रुपयांचा खर्च

सध्या केळीला केवळ दीडशे ते दोनशे रुपये क्विंटलला भाव आहे. म्हणजे एका किलोला दीड ते दोन रुपयांचा भाव आहे. एका किलो सहा ते सात केळी बसतात. म्हणजे या एका केळीला शेतकर्‍यांना २५ ते ३० पैसे भाव मिळतोय. केळी लागवडीपासून एकरी ५० ते ६० हजार रुपयांचा खर्च झालेला आहे. ऐन काढणीच्या वेळी व्यापारी मनमानी करत असतात. त्यात व्यापारी येत नसल्याने केळीचे घड झाडावर पिकत आहेत.

हे देखील वाचा :