---Advertisement---
अमळनेर

माजी महसूलमंत्री थोरात, आमदार डॉ. तांबे यांची मंगळग्रह मंदिरास सदिच्छा भेट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर । माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी १२ ऑगस्ट रोजी मंगळग्रह मंदिरास सदिच्छा भेट दिली.

magal grahamandir

मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त डी. ए. सोनवणे, सौ. जयश्री साबे यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

---Advertisement---

यावेळी बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. संस्थेचे अध्यक्ष श्री. महाले यांनी त्यांना मंगळग्रह मंदिर व संस्था राबवीत असलेले लोकाभिमुख तथा कल्याणकारी उपक्रम तसेच पर्यावरण विषयक चळवळी बाबत माहिती दिली. अल्प कालावधीत विकसित झालेला मंदिर परिसर आणि मिळालेले चार आयएसओ मानांकन व एकूणच कार्याचे श्री.थोरात यांनी कौतुक केले. तसेच संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने शासनस्तरावर काही कामे असल्यास त्यासाठी सहकार्य करण्याचे श्री.थोरात व डॉ. तांबे यांनी अभिवचन दिले.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक मनोज पाटील, मोहन सुपेकर, नामदेव कहांडळ, प्रा. प्रदीप पाटील (चोपडा), श्री. हेंगे, देवेंद्र महाजन, मयूर पाटील आदी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---