⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | बातम्या | यंदा विवाहासाठी तब्बल 52 शुभ मुहूर्त; नोव्हेंबर ते जून महिन्यापर्यंत असे आहेत शुभ मुहूर्त..

यंदा विवाहासाठी तब्बल 52 शुभ मुहूर्त; नोव्हेंबर ते जून महिन्यापर्यंत असे आहेत शुभ मुहूर्त..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । हिंदू धर्मानुसार जेव्हा तुळशी विवाह होतो तेव्हापासून लग्नसराईला सुरुवात होते. हिंदू धर्मात लग्नाच्या बाबतीत मुहूर्ताला सर्वात जास्त महत्त्व आहे. शुभ मुहूर्त पाळल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही.यंदा उद्या म्हणजेच १२ नोव्हेंबर २०२४ मंगळवारी तुळशी विवाह संपन्न होणार आहे. यांनतर १८ नोव्हेंबर २०२४ रोजी लग्नसराईतला पहिला शुभ मुहूर्त असणार आहे. यंदाच्या सालात एकूण ५२ शुभ मुहूर्त असणार आहेत.

या वर्षी म्हणजेच १८ नोव्हेंबर २०२४ पासून शुभ मुहूर्त सुरू होणार आहेत. म्हणजेच दोनाचे चार हात करण्याचा समारंभ हा सुरू होणार आहे. यात ५२ शुभ मुहूर्त असणार आहेत. तर याचा शेवट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ सालाच्या जून महिन्यात असणार आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ४ तारखेला हा शुभ मुहूर्त समाप्त होणार आहे.

शुभ मुहूर्त असे?
यंदाच्या लग्नाचे सर्वाधिक शुभ मुहूर्त पुढील प्रमाणे असणार आहेत:
नोव्हेंबर २०२४ मधील शुभ मुहूर्त दि. १८, २२, २५, २७
डिसेंबर २०२४ मधील शुभ मुहूर्त दि. १, २, ५, ६, ११
जानेवारी २०२५ मधील शुभ मुहूर्त दि. १६, १९, २०, २३, २४, २९, ३०
फेब्रुवारी २०२५ मधील शुभ मुहूर्त दि. २, ३, ७, १६, १९, २०, २१ २३, २६
मार्च २०२५ मधील शुभ मुहूर्त दि. २, ३, ६, ७
एप्रिल २०२५ मधील शुभ मुहूर्त दि. २०, २२, २३, २५, २६, २८, ३०
मे २०२५ मधील शुभ मुहूर्त दि. १, ७, ८, ९, ११, १८, १९, २२, २३, २५, २८
जून २०२५ मधील शुभ मुहूर्त दि. १, २, ३, ४ असे एकूण शुभमुहूर्त आहेत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.