⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

घरफोडीच्या प्रयत्नात असलेला अट्टल घरफोड्या पोलीसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । घरफोडीच्या प्रयत्नात असलेला अट्टल घरफोड्याला पोलिसांनी जेरबंद केले. आरोपी कडून घरफोडीसाठी आणलेले साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपसिंग नजरु भिल्ल ( वय 50 रा.गर्दावाद ता. कोकशी जि. धार मध्य प्रदेश ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. शहरातील स्टेट बँक आँफ इंडीया शिवकाँलणी शाखेच्या बाजुला भगीरत काँलणी मध्ये काल १७ रोजी रात्री २.३० वाजे दरम्यान पोहेकाँ सलीम तडवी व होमगार्ड विनोद ठाकुर गस्तीवर असताना डॉ.पि.डी चव्हाण यांचे घराचे कंपाँऊड समोर सदर इसम संशयास्पद स्थीतीत असल्याचे आढळुन आल्याने त्यास त्याचे नांव विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे त्यावेळी पोहेकाँ सलीम तडवी यांनी त्याची अंगझडती घेतली.

दरम्यान कमरेला पँटचे आतील बाजुस 1) एक टाँमी सुमारे 1 फुट लांबीची दोन्ही बाजुने वाकलेली अशी 2) एक मोठा स्क्रु ड्रायव्हर 3) एक पोपट पान्हा अशा घरफोडी साठी वापरण्यात येणारे साहीत्य मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन शासकीय वाहन बोलावुन पोलीस स्टेशनला आणुन त्याचे नांव गांव विचारले असता त्याने नाव संगितले. त्याच्या विरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा 122 प्रमाणे गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांचे आदेशान्वये पोना. गणेश पाटील हे करीत आहे.

यांनी केली कारवाई
कामी पो.उप.नि गणेश देशमुख, सफौ दिलीप सोनार,पोहेकाँ महेन्द्र पाटील, तुषार जावरे,पोकाँ समाधान पाटील, विकास पहुरकर, रविन्द्र साबळे, विनोद पाटील व चालक पोहेकाँ साहेबराव खैरनार यांनी केली असुन वरील आरोपीताची अधिक माहीती घेता त्याचेवर महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशात घरफोडी सारखे गुन्हे दाखल असुन अजुन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.