जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे शेतात एका ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने झाडाला गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना ११ रोजी १० वाजता उघडकीस आली. याबाबत नंदलाल रामदास बेलदार यांच्या माहितीवरुन पाराेळा पाेलिसांत अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

नंदलाल बेलदार यांचे बंधू गोपाळ बेलदार हे ११ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी जातो असे सांगून गेले होते. परंतु, ते परत न आल्याने तपास केला असता गोपाळ बेलदार यांनी शेतात झाडाला गळफास घेतल्याची रोहित बेलदार यांनी माहिती दिली. त्यानंतर गाेपाळ बेलदार यांना तत्काळ कुटीर रुग्णालयात दाखल केले. परंतु, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले गेले. तपास प्रदीप पाटील करत आहेत.

हे देखील वाचा :
- Parola : दागिन्यांच्या लालसेतून मावशीचा खून; ४० दिवसांनंतर हत्येचा उलगडा, भाच्याला अटक
- Parola : जुन्या भांडणातून चाकू भोसकून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक
- ईको कारच्या मौल्यवान धातूंची चोरी! नाकाबंदीदरम्यान आंतरराज्यीय टोळी जाळ्यात
- कोंबडी खाद्याच्या गोण्यांमध्ये रेशनचा माल; पारोळ्यात काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
- ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण; जीव वाचवण्यासाठी पळताना दुर्दैवी मृत्यू, सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल






