रस्त्यावर दगड आडवे लावून टँकर चालकाला लुटणाऱ्या निघांना अटक

नोव्हेंबर 10, 2022 1:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । रस्त्यावर दगड आडवे टाकून टँकर चालकाला लोखंडी रॉडद्वारे मारहाण करीत लूटण्यात आल्याची घटना अमळनेर-चोपडा रोडवर शनिवार, 5 रोजी रात्री आडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ज्यांच्यासोबत रस्ता लुटीचा प्रकार घडला असेल त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.

jalgaon 2022 11 10T131934.041

दरम्यान, तीनही अटकेतील आरोपी अमळनेर शहरासह ग्रामीण भागातील रहिवासी असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पथकातील पोलीस उपनिरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलीस नाईक मिलिंद भामरे, सुर्यकांत साळुंखे,पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, राजेंद्र देशमाने आदींनी आरोपींना अटक केली. तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now