बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर…राज्याच्या आरोग्य विभागात 3 हजार 466 मेगा भरती

ऑगस्ट 9, 2021 1:45 PM

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक गुडन्यूज आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात ५२ पदांअंतर्गत एकूण २ हजार ७२५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी २० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार याची सविस्तर माहिती मूळ जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.

job

कोणत्या पदांची भरती?
सार्वजनिक आरोग्य विभागात (गट-क) अंतर्गत एकूण ५२ पदाच्या एकूण २७२५ जागा भरण्यात येणार आहेत. भंडार नि वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, एक्सरे तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, दंत यांत्रिकी, डायलिसिस तंत्रज्ञ, दूरध्वनीचालक, वाहनचालक, शिंपी, नळकारागीर, सुतार, नेत्र चिकित्सा अधिकारी, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, भौतिकोपचार तज्ञ, व्यवसोपचार तज्ञ, वार्डन, कनिष्ठ लिपिक, दंतआरोग्यगक, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहायक,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, पेशी तज्ञ, ग्रंथपाल आणि इतर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पात्रता:
10वी/12वी उत्तीर्ण/ प्रयोगशाळा तंत्रज्ञान पॅरामेडिकल पदवी/B.Sc/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Pharm/M.Pharm/GNM/B.Sc (नर्सिंग)/वाहनचालक परवाना/ITI (इलेक्ट्रिशियन/कुशल कारागिर/टेलर/कारपेंटर/B.Sc.(Hon.)/ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा./मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा./10वी+मराठी & इंग्रजी टायपिंग.

वयाची अट: १८ ते ४० (जाहिरात पहावी)

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी :  मागास: ₹600/- [मागासवर्गीय/EWS: ₹400/-]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2021

भरतीबाबतची जाहिरात (Notification) : PDF

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now