जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । जळगाव ते जालना या दोन शहरांना जोडणार्या रेल्वे मार्गाची मागणी कधीपासून करण्यात येत असतांना याबाबत आजवर कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमिवर मंगळवारी जालना-जळगाव या १७४ किमी नवीन रेल्वेमार्गाच्या अंतिम भूखंड सर्वेक्षणास मंगळवारी रेल्वे बोर्डाचे प्रकल्प संचालक पंकजकुमार यांनी मंजुरी दिली. या कामासाठी ४ काेटी ३५ लाख रुपये देण्यात आले आहेत.
जालना व जळगाव येथे मोठी बाजारपेठ असून दोन्ही जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांना एसटी किंवा खासगी वाहनाने ये-जा करावी लागते. त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होते. जालना ते जळगाव रेल्वे मार्ग व्हावा, अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. या मागणीवर चर्चा करून दानवे यांनी या मार्गाला हिरवा कंदील दाखविला असून, या मार्गाचे सर्वेक्षण करण्याला मंजुरी दिली आहे.
यापूर्वी जालना-खामगाव नवीन मार्गाच्या अंतिम भूखंड सर्वेक्षणास मंजुरी मिळाली आहे. आता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या मतदारसंघासाठी हा मार्ग मंजूर करून आणला आहे. ब्रिटिश काळात १९०८ मध्ये जालना-खामगाव मार्गाचे प्रथम सर्वेक्षण झाले होते.
हा रेल्वेमार्ग राजूर, भोकरदन, सिल्लोड या मार्गे जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तुळजापूर, बीड, अंबड, जालना, भोकरदन, सिल्लोड अशा सोलापूर-जळगाव मार्गाचेही सर्वेक्षणही झाले होते. परंतु ताेट्याचे कारण देत हा रेल्वेमार्ग स्थगित करण्यात आल्यावर रेल्वे राज्यमंत्र्यांनी शक्कल लढवून टप्प्याटप्प्याने ही मान्यता मिळवली.
हे देखील वाचा:
- श्रीराम संस्थानतर्फे मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त कीर्तनासह महाभिषेक
- 10वी पास उमेदवारांसाठी गोल्डन चान्स ! रेल्वेत विनापरीक्षा थेट 3612 जागांसाठी भरती
- वेश्याव्यवसायाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल
- विद्यार्थ्यांची यंदा होणार सेतू अभ्यासक्रमातून उजळणी
- माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर माळी
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज