ज्याला सुंदर कलाकृती जन्मास घालावयाची असते त्याला वेदनांशी खेळावे लागते – उत्तम कांबळे

एप्रिल 3, 2022 1:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । शत्रापेक्षा महान शत्र शब्द होतात, शब्द अश्रु होतात व अश्रु पुसणारे हात ही होतात. असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.

erandol 8

एरंडोल येथे औदुंबर साहित्य रसीक मंचातर्फे आयोजित कार्यक्रमा मराठी साहित्य संमेलना प्रसंगी ते बोलत होते. तसेच ३वर्षे पंडीतांनी भोगले त्याची काश्मिर फाईल्स झाली. मात्र ३पिढ्या बरबाद झाल्या त्यावर दलित फाईल आली नाही ही शोकांतीका आहे. ती फाईल साहीत्यिकांनी लिहावी अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. जीवन हे फक्त उत्साही नाही श्वासागणिक लढण्याचा संघर्ष म्हणजे जिवन आहे ते साहीत्यात यावे असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सबनीस यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातुन साहीत्यिकांनी भूमिका घेऊन लिहलं पाहीजे. ज्याला भूमिका त्यांनी लिहलं तर ते लिहणं फक्त मनोरंजन होते असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रारंभी ऍड.निंबाजीराव पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी माजी आमदार महेंद्रसिंह पाटील, अमीत पाटील, विजय जाधव, डॉ.सर्जेराव जिगे, केशव सखाराम देशमुख ‘औदुंबर,चे अध्यक्ष ऍड. मोहन शुक्ला, उपाध्यक्ष प्रा.वा.ना.आंधळे, अरूण माळी, प्रा.बी.एन.चौधरी, डॉ.मिलींद बागुल, वि.दा.पिंगळे, डॉ.पी.जी.पिंगळे, विलास मोरे, विजय महाजन, पी.जी.चौधरी, निंबा बडगुजर, प्रविण महाजन, विजय भामरे, भिमराव सोनवणे, रविंद्र लाळगे, जाकीर हुसैन सैयद आदी उपस्थित होते.

यांचा गौरव

विलास मोरे, बी.एन.चौधरी, मनोहर आंधळे, वि.दा.पिंगळे, वा.ना.आंधळे, डॉ.मिलींद बागुल यांचे साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. तर ऍड. मोहन शुक्ला यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बालकवी चौक या फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच मोरे व आंधळे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

साहीत्यिकांची भूमिका या विषयावर झालेल्या परीसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सर्जेराव जिगे हे होते. डॉ.संजिवकुमार सोनवणे, महेंद्रसिंग पाटील, ऍड.मोहन शुक्ला, वि.दा.पिंगळे, डॉ.बागुल यांनी परीसंवादात सहभाग घेतला. सूत्रसंचालन पी.जी.चौधरी यांनी केले. निंबा बडगुजर यांनी आभार प्रदर्शन केले.

कथाकथनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.बी.एन.चौधरी हे होते. विलास मोरे, जाकीर सैयद, जगदीश पाटील यांनी कथाकथन केले. सुञसंचालन विजय जाधव तर आभार प्रदर्शन विजय भामरे यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक ऍड. मोहन शुक्ला यांनी केले. सुञसंचालन वैशाली पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास मोरे व प्रविण महाजन यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now