जळगाव लाईव्ह न्यूज| १२ ऑगस्ट २०२३। डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवार दिनांक १२ ऑगस्टपासून अॅण्टी रॅगिंग सप्ताहास प्रारंभ झाला. याप्रसंगी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना रॅगिंगबद्दल मार्गदर्शन करुन काही अडचण असल्यास लगेचच समितीकडे तक्रार करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
नॅशनल मेडिकल कमिशन व युजीसी व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या आदेशानुसार डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात १२ ते १८ ऑगस्टपर्यंत रॅगिंग प्रतिबंधक आठवडा साजरा करण्यास प्रारंभ झाला आहे. महाविद्यालयात होणार्या रॅगिंगला आळा बसावा हा या सप्ताहाचा उद्देश्य असल्याचे सहाय्यक प्रा.डॉ.बापूराव बिटे यांनी सांगितले.
त्यासंदर्भात ११ ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात आली होती. येत्या १८ ऑगस्टपर्यंत रॅिंगंगवर कसा प्रतिबंध घालत येईल याबाबत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, लोगो डिझाईन स्पर्धा तसेच अॅण्टी रॅगिंगबद्दल कार्यशाळा, सेमिनार, डॉक्युमेंटरी असे विविध उपक्रम घेतले जाणार आहे. या उपक्रमासाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ एन एस आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांच्यासह प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले.