⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | बातम्या | गांधींची चौथी पिढी आली तरी आता कलम 370 परत येणार नाही; चाळीसगावमधून अमित शहांचा हल्लाबोल

गांधींची चौथी पिढी आली तरी आता कलम 370 परत येणार नाही; चाळीसगावमधून अमित शहांचा हल्लाबोल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२४ । महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली असून विविध मतदारसंघात अनेक नेत्यांच्या सभा आणि मेळावे पार पडत आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच चाळीसगावात महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ सभेत केंद्रीय अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० वरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. गांधींची चौथी पिढी आली तरी आता कलम ३७० पुन्हा येणार नाही म्हणत अमित शहा यांनी हल्ला चढवला.

युती सरकार बनल्यापासून उद्योगधंदे गुंतवणूक कमी झाल्याचे जे म्हणत आहे ते त्यांच्या काळातील गोष्टी सांगतात. आज एफडीआय मध्ये देशात महाराष्ट्र नंबर वन आहे. भाजपाच्या काळात विकासाची कामे झाली होती, ती आघाडी सरकारने विकासाची कामे बंद केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात माहितीचे सरकार बनणार असल्याचे म्हणून काँग्रेस पार्टीने लोकसभेनंतर राहुल गांधी उत्साहात आले हरियाणा निर्मितीमध्ये पाहून त्यांचे टाय टाय फिक्स झाली तर झारखंडमध्ये भाजपाची सरकार बनणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील युती सरकारच बनणार असा त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला. तसेच महायुती आली तर दिल्लीचा खजाना शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी असेल हा शब्द देतो असंही अमित शहा म्हणाले.

काँग्रेसवर टीका करत ते म्हणाले की काँग्रेस पार्टी केवळ कोठे वचन देते व जनतेला झुरवत ठेवते व आपले राजकारण करत असते महाराष्ट्रामध्ये राहुल बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेले संविधान दाखवीत फिरत आहे त्यांनी संसदेमध्ये शपथ घेताना संविधान घेऊन शपथ घेतली. मात्र जेव्हा ते पत्रकारांच्या हाती लागले त्यावेळेस ते सर्व कागद कोरे होते राहुल गांधी यांनी नकली संविधान दाखवून देशाच्या जनतेचाच विश्वास तोडला आहे. जे संविधानावर बोलतात त्यांनी कधी संविधान वाचले आहे का? असाही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंवरही निशाणा
दरम्यान राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणारे, औरंगाबादच्या नामांतरला विरोध करणारे, कलम 370 हटवण्यास विरोध करणारे, पाकिस्तानविरुद्धच्या सर्जिकल स्ट्राईकवर आक्षेप घेणाऱ्या औरंगजेब फॅन क्लबसोबत उद्धव ठाकरे असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंची सर्व तत्त्वे विसरले असल्याचे ते म्हणाले

राहुल गांधी हे आता म्हणत आहेत की, पुन्हा कलम ३७० आणलं जाईल. त्याबाबत त्यांनी एक प्रस्ताव आणला आहे. त्यामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा कलम ३७० आणू असंही ते म्हणत आहेत. मात्र, मी त्यांना सांगतो की, राहुल गांधी तुम्ही तर सोडा तुमच्या चार पिढ्या आल्या तरी आता कलम ३७० पुन्हा येणार नाही, असं अमित शहा म्हणाले. देशात काँग्रेसचे सरकार दहा वर्षे होते, त्यावेळेस आतंकवादी भारतात येऊन बॉम्बस्फोट करून जात त्यावेळेस काँग्रेसने बोर्ड बँकेचे राजकारणात कोणतेच पावले उचलले नाही. मात्र नरेंद्र मोदीच्या सरकारच्या काळात पुलवामा व इतर घटना झाल्यानंतर त्याला तोडीस तोड असे उत्तर देण्यात आले आहे. येणाऱ्या ३१ मार्च २०२६ मध्ये देशातून नक्षलवाद संपणार हा माझा शब्द आहे असं अमित शहा म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.