---Advertisement---
गुन्हे

दुर्दैवी : दिवाळीच्या धामधुमीत पुत्राला वाचवताना पित्याचाही मृत्यू, बहिणीचा प्रचंड आक्रोश

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । पाचोरा तालुक्यात वणगाव मुलाणे येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. ती म्हणजे पिता आणि पुत्राचा एकाच वेळेस नदीत बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक माहिती अशी की, वडगाव मुलाणे येथील लालसिंग पंडित पवार हे आपल्या कृष्णा या मुलासोबत दिवाळीच्या दिवशी शेतामध्ये गेले होते. शेतातून परत येत असतांना कृष्णाचा पाय घसरून तो नदीत पडला. यामुळे लालसिंग पवार यांनी देखील नदीत उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनाही पोहता येत नसल्याने नदीत दोघांचा बुडून मृत्यू झाला.

in well death

लालसिंग पवार आणि कृष्णा पवार या दोन्ही बाप-लेकाचा एकाच वेळेस करूण अंत झाल्यामुळे वडगाव-मुलाणेसह परिसरात शोककळा पसरली आहे. काल सकाळी अतिशय शोकाकुल वातावरणात या दोन्हींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार किशोर पाटील यांनी मयतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---