जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे मन्यारखेडा येथे शुक्रवारी ‘माझा एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रम अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर यांनी शेतकऱ्यांसमवेत संवाद साधला. यामध्ये कापूस पिकावरील किड व रोग नियंत्रण, विविध खतांचा योग्य वापर, तुर पिकावरील किड व रोग नियंत्रण, प्रक्रिया उद्योग, कांदा पिकाची किड व रोग नियंत्रण आणि काढणी करतांना घ्यावयाची काळजी या गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्याचे निरसण केले. यावेळी नितिन पगार( मंडळ कृषी अधिकारी), अजय गुरचळ, शेषराव पाटिल, कृषि सहाय्यक नामदेव बहिरम, राशि कंपनी प्रतिनिधि गोविंद म्हसाने व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.